हायटेक फसवणूक! एका लिंकवर केले क्‍लिक आणि खात्यातून गेले एक लाख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

नागपूर : मोबाईलवर येणाऱ्या एका लिंकवर क्‍लिक करणे एका राज्य राखिव पोलिस दलाच्या जवानाला खूप महागात पडले. ट्रॅव्हल्सच्या बुकिंगसाठी गुगलवर नंबर शोधला. फोन केल्यानंतर मोबाईलवर एक लिंक आल्यानंतर त्यावर क्‍लिक करताच खात्यातून चक्‍क एक लाख रूपये लंपास झाले. ही धक्‍कादायक घटना आज उघडकीस आली. गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक बबन बनसोडे (27) रा. महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी, सांगली असे या शिपायाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक बनसोडे हे कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलिस बल गट 16 येथे कार्यरत आहेत. मागील तीन महिन्यांपासून ते गोंदिया जिल्ह्यातील गोठणगाव येथे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या गावी सांगलीला जायचे असल्याने 8 ऑक्‍टोबर 2019 रोजी नागपूरला आले. दुपारी 3.45 च्या सुमारास ते गणेशपेठ बसस्थानकावर आले. त्यांनी चौकशी केली असता सांगलीला जाणारी बस नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर खुराणा ट्रव्हल्सचा ऑनलाईन नंबर सर्च केला. मिळालेल्या नंबरवर बनसोडे यांनी फोन करून सांगलीला जाण्यासाठी तिकीट बूक करायची असे म्हटले. त्यावर समोरच्या व्यक्तीने बनसोडे यांना एक लिंक पाठवून त्या लिंकवर ऑनलाईन 50 रुपये टाकण्यास सांगितले.

नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

50 रुपये पाठविल्यावरच तुमचे तिकीट कन्फर्म होईल असेही त्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे बनसोडे यांनी गुगल प्लेमधून 50 रुपये ऑनलाईन वळते केले. त्यानंतर लगेच त्यांना त्यांच्या एचडीएफसी खात्यातून एक लाख रुपये वळते केल्याचा मॅसेज आला. पैसे काढणाऱ्याने पाचवेळा 20 हजार रुपये असे एक लाख रुपये ऑनलाईन काढून घेतले. मोबाईलवर पैसे काढल्याचा मॅसेज वाचून बनसोडे यांना धक्काच बसला. लगेच त्यांनी ज्या इसमाला फोन केला होता त्याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बनसोडे यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आज अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, online, cyber crime