esakal | नागरिकांच्या जीवात आला जीव; ‘वॉंटेड’ दुचाकी चोरट्याला नागपूर पोलिसांनी केली अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Police arrested wanted two wheeler thief

काही नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी तर काहींचे दागिने चोरी गेल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या सर्व तक्रारींना गांभीर्याने घेत पोलिसांनी धडक कारवाई केली आणि यात एका कुख्यात चोराला जेरबंद केले आहे.  

नागरिकांच्या जीवात आला जीव; ‘वॉंटेड’ दुचाकी चोरट्याला नागपूर पोलिसांनी केली अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात चोरट्यांचा हैदोस सूरु आहे. नागरिकांच्या प्रचंड तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. काही नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी तर काहींचे दागिने चोरी गेल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या सर्व तक्रारींना गांभीर्याने घेत पोलिसांनी धडक कारवाई केली आणि यात एका कुख्यात चोराला जेरबंद केले आहे.  

शहरातील विविध भागातून दुचाकी चोरण्यास पटाईत असलेला ‘वॉंटेड’ चोरट्यास हुडकेश्‍वर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नितीन दिलीप रेवडीया (३२, किर्तीनगर, नरसाळा) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सागरकर (अंबिकानगर) हे सोसायटीचे डेली कलेक्शन एजंट आहेत. १४ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ते कामावरून घरी आले. त्यांनी घराच्या पार्कींगमध्ये दुचाकी उभी केली आणि घरात गेले. दरम्यान आरोपी नितीन रेवडीया याने ‘मास्टर की’चा वापर करीत दुचाकी चोरून नेली. त्यांच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

अखेर दिली कबुली

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि शोध घेतला असता आरोपी संशयास्पदरित्या दुचाकी चालवित असताना मिळून आला. त्याला ताब्‍यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्याला खाकीचा हिसका दाखवताच त्याने तब्बल चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. 

पोलिसांनी लगेच चोरीच्या दुचाकी त्याच्या घरातून हस्तगत केल्या. त्याने हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी तर अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरी केली होती. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

ही कामगिरी नवनियुक्त पोलिस उपायुक्ती डॉ. अंकुश शिंदे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे, गुन्हे निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनात डीबीचे प्रमुख स्वप्नील भुजबळ, हवालदार शैलेश ठवरे, परेश दिवटेलवार, नापोशी राजेश डेकाटे, अश्‍वीन बडगे, आशिष तितरमारे, प्रदीप भदाडे, रूपाली निनावे यांनी केली.

 संपादन - अथर्व महांकाळ