esakal | काय सांगता! पोलिसांना महापौरांच्या आदेशाची माहितीच नाही? परवानगी असूनही केला मासोळी बाजार बंद

बोलून बातमी शोधा

Nagpur police order to closed fish market mayor reopen it in Nagpur }

मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने बंददरम्यान मास विक्री सुरू ठेवण्याचे आदेश काढले. परंतु पोलिसांना या आदेशाची माहितीच नसल्याचे आज महापौर दयाशंकर तिवारी यांच्या दौरादरम्यान पुढे आले. 

nagpur
काय सांगता! पोलिसांना महापौरांच्या आदेशाची माहितीच नाही? परवानगी असूनही केला मासोळी बाजार बंद
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे शनिवार, रविवार बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने बंददरम्यान मास विक्री सुरू ठेवण्याचे आदेश काढले. परंतु पोलिसांना या आदेशाची माहितीच नसल्याचे आज महापौर दयाशंकर तिवारी यांच्या दौरादरम्यान पुढे आले. महापौर तिवारी यांनी लगेच पोलिस उपायुक्तांशी संपर्क साधून मास विक्री सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मासोळी बाजार सुरू झाला.

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाने मिनी लॉकडाऊनअंतगर्त शनिवार, रविवार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आज संपूर्ण शहरातील बाजारपेठा, दुकाने बंद होती. या बंददरम्यान मास विक्रीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. या आदेशाची प्रत महापालिका, पोलिसांनाही देण्यात आली. परंतु आज पोलिसांच्या संभ्रमामुळे मासोळी बाजारातील व्यापाऱ्यांना फटका बसला. 

हेही वाचा - ग्राहकांनो, आतातरी सावध व्हा, दारावर सिलिंडरचे वजन करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पोलिसांना माहितीच नसल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या या परिसरातील दौऱ्यादरम्यान पुढे आले. महापौर तिवारी यांनी आज शहराच्या काही भागात बंददरम्यान पाहणी केली. ते मेयो हॉस्पिटलसमोरील भोईपुरा येथील मासोळी बाजारात गेले असता पूर्ण बाजार बंद दिसला. याबाबत त्यांनी येथील काही विक्रेत्यांना विचारणा केली. विक्रेत्यांनी पोलिसांनी बंद ठेवण्याच्या सूचना केल्याचे महापौरांना सांगितले. 

मास विक्रीचे आदेश असताना मासोळी बाजार बंद ठेवल्याबाबत महापौरांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याशी चर्चा केली. पोलिस उपायुक्त मथानी यांच्याशी बोलून मार्केट सुरू करण्याच्या सूचना कराव्या, असे महापौरांनी जोशी यांना सांगितले. त्यानंतर महापौरांनी या बाजाराची पाहणी केली तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याच्या सूचना केल्या.

मासोळी विक्रेत्यांचे नुकसान

महापौर मासोळी बाजारात दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांना फोन करणे, मार्केट सुरू करण्यापर्यंत तासभराचा कालावधी गेला. त्यामुळे सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत मासोळी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

हेही वाचा - धक्कादायक! सेवानिवृत्त आर्मी जवानाच्या घरावर छापा; जीवंत काडतुससह मोठा शस्त्रसाठा...

महापालिका व जिल्हा प्रशासनाने मास विक्रीचे आदेश काढले होते. परंतु पोलिसांना याबाबत गैरसमज करून घेत मासोळी बाजार बंद केला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना याबाबत विचारणा केली अन् व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्याच्या सूचना केल्या.
- दयाशंकर तिवारी, 
महापौर. 

संपादन - अथर्व महांकाळ