अनुष्का शर्माच्या घरात शिरला डायनासोर, नागपूर पोलिस म्हणाले, वन विभागाला पाठवू का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली कायमच जगभ्रमंतीवर असतो. अभिनयाच्या क्षेत्रात दमदार कामगिरी गाजविणारी अनुष्का शर्मा हीदेखील विविध चित्रीकरणाच्या शेड्यूलमध्ये व्यस्त असते. लॉकडाउन असल्याने दोघेही घरी एकत्र असल्याने हा काळ अतिशय आनंदाने ते साजरा करीत आहेत. नुकताच अनुष्का शर्माचा वाढदिवसदेखील दोघांनी जल्लोषात साजरा केला व त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही जोडी कायमच चर्चेत असते. नुकताच अनुष्का शर्माने सोशल मीडिया अकाउंटवर "I spotted... A Dinosaur on the loose' असे कॅप्शन देत विराटचा डायनासोर स्टाइलमध्ये चालताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टला थेट नागपूर पोलिसांनी प्रतिसाद दिला आहे. "मदतीसाठी वन विभागाला पाठवू का?' असा विनोदी प्रश्न अनुष्काला नागपूर पोलिसांनी विचारला आहे.

लॉकडाउन काळात त्यांच्या मुंबईच्या घरात राहत असलेले विराट कोहली व अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. विविध प्रकारे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे, या स्टार जोडीला चाहत्यांकडूनही भरपूर प्रेम मिळते. विराट कोहलीचा असाच एक डायनॉसोरच्या पोस्टमधला फोटो अनुष्का शर्माने ट्‌विट केला. इतकेच नव्हे, तर मी आत्ताच एक डायनॉसोर बघितला आहे, असेदेखील फोटोबाबत म्हटले आहे. या पोस्टला उत्तर देत नागपूर शहर पोलिसांनी "वन विभागाला पाठवायचे का?' असा विनोदी प्रश्न अनुष्काला विचारला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या युद्धात अहोरात्र झटणाऱ्या नागपूर शहर पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणाऱ्या पोलिस विभागातील प्रत्येकाच्या डोक्‍यावर कामाचा ताण आहे. तरीही प्रसंगावधान साधून नागपूर शहर पोलिसांनी केलेल्या विचारलेल्या या विनोदी प्रश्नाला विराट-अनुष्काच्या चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.

अवश्य वाचा - मुंढे साहेब, विलगीकरणात उपचारासाठी आणले की उपाशी मारायला?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली कायमच जगभ्रमंतीवर असतो. अभिनयाच्या क्षेत्रात दमदार कामगिरी गाजविणारी अनुष्का शर्मा हीदेखील विविध चित्रीकरणाच्या शेड्यूलमध्ये व्यस्त असते. लॉकडाउन असल्याने दोघेही घरी एकत्र असल्याने हा काळ अतिशय आनंदाने ते साजरा करीत आहेत. नुकताच अनुष्का शर्माचा वाढदिवसदेखील दोघांनी जल्लोषात साजरा केला व त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur police reply on Anushka Sharma tweet