esakal | नागपूर पोलिसांनी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यातील वरुणचा फोटो का केला ट्विट?
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur police tweet photo of varun chakraborty in KKR and delhi capitals match

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात  दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. याच सामन्यामध्ये १२ वे षटक वरुणने टाकले. या षटकामध्ये फलंदाजाने वरुणला षटकार लगावल्यानंतर त्याने दिलेली रिअ‌ॅक्शन अगदीच मजेशीर होती. त्यामुळे अनेक मिमर्सने यावर मिम्स तयार केले.

नागपूर पोलिसांनी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यातील वरुणचा फोटो का केला ट्विट?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - शनिवारी कोलकाता नाइड रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल, असा सामना रंगला. त्यामध्ये वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर षटकार लगावल्यानंतर त्याने दिलेली रिअ‌ॅक्शन कॅमेरामध्ये अचूक टिपली गेली आणि हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. अनेक मिमिर्सने त्यावर मिम्स देखील बनवले. सोशल मीडियावर याच फोटोची चर्चा रंगली. पण, नागपूर पोलिसांना मात्र हा फोटो ट्विट करत नागरिकांना एक चांगला संदेश दिला आहे.    

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात  दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. याच सामन्यामध्ये १२ वे षटक वरुणने टाकले. या षटकामध्ये फलंदाजाने वरुणला षटकार लगावल्यानंतर त्याने दिलेली रिअ‌ॅक्शन अगदीच मजेशीर होती. त्यामुळे अनेक मिमर्सने यावर मिम्स तयार केले. पाहता पाहता फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यातच नागपूर पोलिसांनी हा फोटो ट्विट करून एक महत्वाचा मेसेजही दिला. 

हेही वाचा - पायदळ जाताय ना, मग मोबाईलवर बोलू नका; चोरटे आहेत तुमच्या मागावर!

'जेव्हा तुम्ही स्वत:चा ओटीपी एखाद्या फसवणूक करणाऱ्या खोट्या बँक अधिकाऱ्याला देता', असं कॅप्शन देत नागपूर पोलिसांनी हा फोटो शेअर केलाय. तसेच 'तुम्हाला कोणीही फोन केला आणि तुमची खासगी माहिती मागितली तर त्यांना तुमचा ओटीपी आणि सीव्हीव्ही क्रमांक देऊ नका', असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. सायबर क्राईमपासून जनतेला सावध करण्यासाठी पोलिसांनी अगदी अचूकपणे हा फोटो वापरल्याने नागरिकांनी ट्विट करत नागपूर पोलिसांच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे.

विराटचाही व्हिडिओ केला होता रिट्विट -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट बंदच होते. तसेच चित्रपटांची शूटिंगही बंद होती. त्यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही घरातच होते. एकमेकांना वेळ देत होते. असाच अनुष्काने 'मला डॉयनॉसोर दिसला' असं कॅप्शन देत विराटचा एक व्हिडिओ शेअर केला होता. 'या डॉयनॉसोरला पकडण्यासाठी आम्ही महाराष्ट्र वनविभागाला पाठवू का?' असं म्हणत नागपूर पोलिसांनी तोच व्हिडिओ रिट्विट केला होता. 

हेही वाचा - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु 

आयपीएलबद्दल सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस - 
कोरोना आला आणि सर्वच क्रिडा स्पर्धा बंद झाल्या. आयपीएल होणार की नाही, अशीही चर्चा होती. शेवटी आयपीएलचा सामना रंगलाच. त्यामुळे चाहत्यांना अनेक महिन्यानंतर क्रिकेटचा आनंद घेता येत आहे. आता सोशल मीडियावरही आयपीएलचीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. दररोज आयपीएलमधील काही निवडक घडामोडींबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतो.