नागपूरच्या प्राध्यापकाची गगनभरारी; जागतिक संशोधकांच्या यादीत समावेश; अप्लाईड फिजिक्समध्ये ८१७ संशोधन पेपर  

मंगेश गोमासे 
Thursday, 5 November 2020

डॉ..संजय ढोबळे हे एलईडी, रेडीऐशन डॉसीमेट्री मटेरीयल, बॉयोसिंथेसीस, वॉटर प्युरीफीकेशन, फ्लाय ॲश व नॅनोमटेरीयल यावर संशोधन कार्य केले आहे. या विषयांमध्ये त्यांनी आतापर्यंत ८१७ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे

नागपूर ः भौतिकशास्त्र (अप्लाईड फिजीक्स) या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय जानराव ढोबळे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेतील स्टॅंडफोर्ड विद्यापीठातील डॉ. जॉन लोन्नडीस, डॉ.केवीन बॉयक आणि डॉ. जेरोन बास या तीन वैज्ञानिकांनी विश्वभरातील संशोधकांचा स्कोपस डाटा बेसवरून माहिती घेऊन त्यांच्या स्कोपसमधील साईटेशन, एच-इंडेक्स व प्रकाशित झालेली शोध निबंधाची संख्या यावरून जगभरातील संशोधकांची माहिती एकूण १७६ उपविषयामध्ये वेगळी केली. त्यानुसार प्रत्येक विषयात जगभरातील टॉप २ टक्के वैज्ञानिकांची यादी तयार केली आहे. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

डॉ..संजय ढोबळे हे एलईडी, रेडीऐशन डॉसीमेट्री मटेरीयल, बॉयोसिंथेसीस, वॉटर प्युरीफीकेशन, फ्लाय ॲश व नॅनोमटेरीयल यावर संशोधन कार्य केले आहे. या विषयांमध्ये त्यांनी आतापर्यंत ८१७ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केले आहे. यात ‘स्कोपस' मध्ये ६१७ शोधनिबंधांचा समावेश आहे.

त्यांनी आपल्या संशोधन कार्यामधे एकूण ६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यातून त्यांनी १० शोधकर्त्या विद्यार्थ्यांना परदेशात पोस्ट डॉक्टरेट साठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी एकूण ३१ पेटंट प्रकाशित केले असून त्यापैकी २ पेटंट ला मान्यता मिळाली आहे.

एल्सविअर, नोवा, सीआरसी यासह आंतरराष्ट्रीय प्रकाशनाद्वारे १५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी १६ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी संशोधन कार्यासाठी एकूण १२ देशात भेट दिली आहे. तसेच इंडिया टॉप फकल्टी अवार्ड, विद्यापीठ उत्कृष्ट संशोधक अवार्ड, विदर्भ रत्न अवार्ड व डॉ. मेघनाथ साहा संशोधक अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी - साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज 

जगभरातील टॉप वैज्ञानिकांमध्ये त्यांचे नाव आल्यामुळे त्यांना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. निरज खटी व इतर प्राध्यापकांनी डॉ. संजय ढोबळे यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या परिवाराला व साहाय्यक संशोधकांना देतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur professor is in list of world scientists