
वायरलेस कंपन्यांद्वारे बाजारात 'ड्युअल बॅन्ड अॅन्टिना' उपलब्ध करुन देण्यात येतात. या अॅन्टिनांची क्षमता २.४ गीगाहट्झ ते ५.० गीगाहट् असते. मात्र, फ्लेक्झिबल नसतात. त्यामुळे आपल्याला हव्या त्या ठिकाणी वा आकारात बसविता येणे शक्य होत नाही.
नागपूर : एकदा अॅन्टिना एका जागी लावला की त्यानंतर त्याची हालचाल करता येत नाही. त्याच्याच रेंजमध्ये सर्व कामे करावी लागतात. गरजेनुसार त्याचे ठिकाणही वेळोवेळी बदलवता येत नाही. वापरकर्त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींगच्या प्राध्यापिकेने फ्लेक्झिबल अॅन्टिनाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली आहे. त्याचे पुणे येथील डिफेन्स आर एण्ड डी ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) येथून चाचणीसुद्धा केली आहे.
वायरलेस कंपन्यांद्वारे बाजारात 'ड्युअल बॅन्ड अॅन्टिना' उपलब्ध करुन देण्यात येतात. या अॅन्टिनांची क्षमता २.४ गीगाहट्झ ते ५.० गीगाहट् असते. मात्र, फ्लेक्झिबल नसतात. त्यामुळे आपल्याला हव्या त्या ठिकाणी वा आकारात बसविता येणे शक्य होत नाही. मात्र, आता या वायरलेस कंपन्यांना या अॅन्टिनाचा नवा पर्याय मिळणार आहे.
हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का
देशात मोबाईल कंपन्यांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी वायरलेस नेटवर्क मिळावे यासाठी कंपन्यांकडून वायफाय आणि पोर्टेबल वायरलेस अॅन्टिना तयार करण्यात येतात. मात्र, सध्या बाजारात येणारे 'ड्युअल बॅन्ड एंटेना' आपल्याला हव्या त्या ठिकाणी वा आकारात बसविता येणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे हे अॅन्टिना मल्टीबॅन्ड अप्लीकेशन देतात. ते तयार करीत असताना, एचिंग प्रोसेस, मास्कींग प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे त्याची किंमतही जास्त असते. त्यामुळे स्वस्त आणि फ्लेक्झिबल अॅन्टिना तयार करण्याच्या उद्देशाने देवश्री श्रीश मारोतकर यांनी त्यावर संशोधन सुरू केले. त्यांनी 'डीझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना फॉर वायरलेस लॅन' या विषयावर विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला. त्यातून त्यांनी 'वायरलेस फ्लेक्झिबल अॅन्टिना'ची संकल्पना मांडली. यासाठी त्यांना दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. झाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. विशेष म्हणजे, त्यांनी मांडलेल्या वायरलेस संकल्पनेतील अॅन्टिना फोटोग्राफीक पेपर आणि पॉलिमरचा वापर करुन तयार करण्यात आले आहे. यात मल्टीबॅन्ड अप्लीकेशन असून त्यात ब्लु टुथ, वायफाय, झिग बी, २.४ ते ५.२ गीगाहट्झ डब्ल्यु-लॅन, वायमॅक्स अप्लीकेशनचा समावेश आहे. यामुळे वायरलेस कंपन्यांना नवा पर्याय यामुळे मिळणार आहे.
हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं
बदल करुन बऱ्याच कामात पडणार उपयोगी -
डॉ. देवश्री श्रीश मारोतकर यांनी संशोधनातून तयार केलेल्या फ्लेक्झिबल अॅन्टिनामध्ये काही आवश्यक बदल केल्यास भविष्यात येत्या काळात सैन्यातील जवान आणि इतर कामात ते उपयोगी पडणार आहे.
संशोधनातून मांडलेल्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला अॅन्टिना अतिशय स्वस्त आणि जास्त क्षमतेचा आहे. त्यामुळे याचा निश्चितच वायरलेस कंपन्यांना फायदा होणार
-डॉ. देवश्री मारोतकर, प्राध्यापक, इलेक्ट्रानिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग.