
नागपूर : उपराजधानीत केव्हा काय घडेल याचे सोयरसूतक नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांच्या वैरत्वाचे भाव येथे प्रकट होत आहेत. क्षुल्लक कारणावरून कुण्या एका युवकाचा खून होतो; तर वारंवारच्या कटकटीमुळे प्रेयसीचाही जीव घेतला जातो. एका युवकाचा अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शनिवारी (ता. 18) सकाळी मानकापूर क्रीडा संकुलाच्या भिंतीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.
चिंगारू (वय 32, मानकापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गेल्या 48 तासांत उपराजधानीत चौघांचे हत्याकांड उघडकीस आले. त्यामुळे गृहमंत्र्यांच्याच शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर क्रीडा संकुलाजवळील एका भिंतीलगत एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बुधवारी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही नागरिकांना दिसला होता. त्यांनी लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून या घटनेची माहिती दिली. माहितीवरून मानकापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला.
अज्ञात आरोपींनी त्या युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सायंकाळपर्यंत खून झालेल्या युवकाची ओळख पटली. खून झालेल्या युवकाचे नाव चिंगारू असे असून तो कचरा वेचून उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो बेवारसप्रमाणे फुटपाथवर पडून राहत होता. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनीच त्याचा खून केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मानकापूर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
नागपूर : कुख्यात गुंडाने आपल्या प्रेयसीचा लग्नाचा तगादा लावल्यामुळे गळा आवळून खून केला. ही घटना अजनीतील जंजाळ लेआउटमध्ये शुक्रवारी (ता. 17) सायंकाळी उघडकीस आली. प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारने आरोपी प्रियकर कुख्यात गुंड सोनू पंकज गणवीर (वय 23, रा. रहाटेनगर झोपडपट्टी) याला अटक केली आहे. आरती भलावी (वय 25, शताब्दीनगर) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू गणवीर याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे आणि आरतीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोनूने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून प्रेयसी तगादा लावत असतानाही तो तिला लग्नास नकार देत होता. ती नेहमी लग्नाबाबत विचारून त्याला अडचणीत आणत होती.
सोनूने आरतीला शुक्रवारी अजनीतील जंजाळ लेआउटमधील एका निर्माणाधीन इमारतीत नेले. तेथे सोनूने मनसोक्त दारू ढोसली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची चर्चा आहे. तिचा एकदाचाच काटा काढण्याच्या उद्देशाने सोनूने आरतीचा गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह तेथेच सोडून तो पळून गेला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. अजनी पोलिसांनी या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. आरोपी सोनू गणवीर याला गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, किरण चौगुले आणि दिलीप चंदन यांनी सापळा रचून अटक केली.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.