Video : चक्क बियर पीत चालवत होता एसटी, व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

nagpur st bus driver video got viral
nagpur st bus driver video got viral

नागपूर : सोशल मिडियाच्या जमान्यात एकदा बाहेर आलेली गोष्ट सहसा लपत नाही. जर ती बाब चुकीची असेल तर नेटिजन्सकडून सपाटून मार खावा लागतो. असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एका एसटी चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो चक्क बियर पिताना गाडी चालवताना दिसत होता. या व्हिडिओने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या श्रमिकांना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडून परतीच्या प्रवासात चालक, वाहकाने गाडीतच ओली पार्टी केली. या प्रसंगाची क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर चालक व वाहकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

चालक विशाल मेंढे आणि वाहक पराग शेंडे अशी निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 16 मे रोजी एमएच 40- 5581 क्रमांकाच्या बसने सुमारे 22 मजुरांना सोडण्यासाठी ते रवाना झाले. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या खवासायेथील चेकपोस्ट परिसरात मजुरांना सोडून दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. अन्य एक व्यक्ती त्यांच्यासोबत होता. वाटेत तिघांनीही धावत्या बसमध्येच बियरची पार्टी केली.

एसटीत "ओली पार्टी' भोवली चालक, वाहक निलंबित

या घटनांचे मोबाईलवर चित्रिकरणही केले. चालक चक्क बस चालवतांना बियरचे घोट घेत असल्याचे चित्रफितीत कैद झाले असून ही क्‍लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली. गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने प्राथमिक चौकशी करत अहवाल विभाग नियंत्रक कार्यालयाकडे सादर केला.

त्यावरून विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी गुरुवारी दोघांनाही निलंबित केले. त्यांची एसटीच्या सुरक्षा चमूकडून चौकशीही केली जाणारे आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यासह चमूकडून पाच ते सहा दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाण्याची शक्‍यता आहे. या अहवालानंतरच पुढील कारवाई संदर्भात निर्णय होणार असल्याचे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com