जेईई मेन्समध्ये नागपूरकर विद्यार्थ्यांची बाजी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

नागपूर : आयआयटी, एनआयटीसह अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली "जेईई-मेन्स' या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला.

नागपुरातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा "क्रॅक' केली असून ते "जेईई-ऍडव्हान्स' या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 
"एनटीए'तर्फे 7 ते 9 जानेवारीदरम्यान जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयांमधून 7 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 300 हून अधिक विद्यार्थी त्यात उत्तीर्ण ठरले आहेत.

नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

उत्तीर्ण विद्यार्थी एनआयटीसह नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी "आयआयटी'साठी आवश्‍यक "जेईई-ऍडव्हान्स' परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 20 मे रोजी "जेईई ऍडव्हान्स' परीक्षा होणार असून "जेईई-मेन्स' परीक्षा 5 एप्रिल, 7 ते 9 एप्रिल व 11 एप्रिलला घेण्यात येणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur students tops in JEE mains