esakal | उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतोय; मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीपार

बोलून बातमी शोधा

Nagpur summer news The heat wave is increasing day by day}

उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. ही शक्यता लक्षात घेता खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळ- संध्याकाळ नियमित व्यायाम व प्राणायामासोबतच पुरेशी झोप व हलका आहार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

nagpur
उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतोय; मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीपार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीपार गेला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचे संकेत दिल्याने उष्माघातासारखे आजार डोके वर काढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

कमाल तापमानाने गेल्या चोवीस तासांत अचानक उसळी घेत या मोसमात प्रथमच चाळीशी गाठली. विदर्भात ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल तापमानाची नोंद अकोला (४०.१ अंश सेल्सिअस) व चंद्रपूर (४०.० अंश सेल्सिअस) येथे झाली. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही पारा झपाट्याने वाढत आहे. अनुकूल वातावरण लक्षात घेता, या आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्याचवेळी आठवड्याअखेरीस ढगाळ वातावरण व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

उन्हाळा सुरू झाल्याने आजारही वाढू लागले आहेत. या दिवसांमध्ये उष्माघातासारखे जीवघेणे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची अधिक गरज आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. ही शक्यता लक्षात घेता खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळ- संध्याकाळ नियमित व्यायाम व प्राणायामासोबतच पुरेशी झोप व हलका आहार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

हे करा

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सदैव कॅप, गॉगल, दुपट्टा, छत्रीचा वापरा करा. उन्हातून आल्यावर सहसा नैसर्गिक थंड पेय किंवा गूळ पाणी प्यावे. शक्यतो माठातील थंड पाणीच प्यावे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. तसेच जिरेपूड असलेले ताक, मठ्ठा, लिंबू, आवळा, सरबताचे नियमित सेवन करावे. याशिवाय खडीसाखर, कलिंगड, सफरचंद, चिकू, लिंबू, काकडी, पालक व कच्चे टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, पुदिना, बीट, डाळिंब, उसाचा रस (बर्फ न घालता) व नारळाचे (शहाळे) पाणी प्यावे.

अधिक वाचा - नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

हे टाळा

शक्यतो भर उन्हात घराबाहेर पडू नये. उन्हातून घरी आल्यावर सहसा कुलरसमोर बसू नये. बर्फमिश्रित पेय, कोल्ड्रिंक्स, चहाचे सेवन करू नये. फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये. तसेच संत्री, आंबा, आले, लसूण, बटाटा, मध, पपई, मध, गूळ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर या उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.

संपादन - नीलेश डाखोरे