विद्यापीठ २ नोव्हेंबरला नॅककडे पाठविणार 'सेल्फ स्टडी रिपोर्ट', एप्रिलमध्येच संपला दर्जा

मंगेश गोमासे
Monday, 12 October 2020

विद्यापीठातील गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी नॅकचे मूल्यांकन करण्यात येते. यापूर्वी कुलगुरू डॉ. सि. प. काणे हे इंटरनल क्वॉलिटी एश्‍श्‍युरन्स सेलचे (आयक्‍यूएसी) प्रमुख असताना त्यांनीच हा अहवाल सादर केला होता.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला गेल्या वेळी नॅकचा 'अ' दर्जा मिळाला होता. त्यासाठी मिळालेल्या प्रमाणपत्राची मुदत डिसेंबरपर्यंत होती. नियमाप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' पाठविणे आवश्‍यक आहे. मात्र, हा रिपोर्ट नॅककडे अद्याप पाठविण्यात आला नाही. एप्रिलमध्येच विद्यापीठाचा दर्जा संपला आहे. आता २ नोव्हेंबरला सेल्फ स्टडी रिपोर्ट पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा - खासदार साहेबऽऽ हे बरं नव्हं; नवनीत राणा यांनी धावत्या एसटीच्या दारात उभे राहून दिली प्रतिक्रिया

विद्यापीठातील गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी नॅकचे मूल्यांकन करण्यात येते. यापूर्वी कुलगुरू डॉ. सि. प. काणे हे इंटरनल क्वॉलिटी एश्‍श्‍युरन्स सेलचे (आयक्‍यूएसी) प्रमुख असताना त्यांनीच हा अहवाल सादर केला होता. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात नॅक मूल्यांकनासाठी समिती येणार असल्याने मार्चमधील अर्थसंकल्पात तयारीच्या दृष्टीने बरीच भरीव तरतूद करण्यात आली. या तरतुदीतून नॅकचा ग्रेड सुधारण्यासाठी बराच मोठा संकल्प करण्यात आला. त्या दृष्टीने आयक्यूएससी सेलच्या प्रमुखांना निर्देशही देण्यात आले. मात्र, त्यावेळी सहा महिन्यांपूर्वी नॅकसाठी आवश्‍यक असलेला सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करण्यात विद्यापीठ अपयशी ठरले.

हेही वाचा - 'चार एकरात सोयाबीन पेरले, दुबार पेरणीही केली; पण परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं झालंय'

नॅक मूल्यांकन केले नसल्यास विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग आणि 'रूसा'कडून मिळणारा निधी थांबविण्यात येणार होता. मात्र, मार्चपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नॅकद्वारे मूल्यांकनासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे आता विद्यापीठाच्या समितीने १५ ऑक्टोबरला सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. हा अहवाल तयार करण्यात आला असून, २ नोव्हेंबरला पाठविण्यात येणार आहे. यानंतर पुढील वर्षी नॅकद्वारे मूल्यांकन होण्याची शक्यता आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur university will send self study report on 2 november