नागपुरातील प्रसिद्ध खर्ऱ्याचे वाढले भाव, तंबाखूत मिसळवले जाते हे...

संदीप गौरखेडे
सोमवार, 25 मे 2020

राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. साठेबाजारांनी तंबाखूची चढ्या भावात विक्री केली. त्याबरोबरच सुपारीचेदेखील भाव वाढल्याचे कारण पुढे करीत चढ्या भावात विकली. यामुळे खर्ऱ्याचे भाव आकाशाला भिडले.

कोदामेंढी (जि.नागपूर) : विदर्भात नाही म्हटले तरी खर्ऱ्याचे बरेच शौकीन आहेत. आणि तो खाल्ल्याशिवाय बऱ्याच लोकांचे भागात नाही. तसाही विदर्भातील विशेषतः नागपुरातील खर्रा प्रसिद्ध समजला जातो. कोरोना आणि देशात लागू झालेली संचारबंदी यामुळे मोठी फजिती झाली. संचारबंदीची संधी साधून तंबाखू आणि सुपारी अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून चाणाक्ष व्यापाऱ्यांनी साधवून घेतले. काहींनी मोठया प्रमाणात तंबाखूच्या नावाने पालापाचोळा विकून शौकीनांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू केला. खर्ऱ्याचे भाव आकाशाला भिडले. नाही म्हणता नागपूरी खर्ऱ्याने उच्चांकी गाठली आहे.

हेही वाचा : पानठेला सांभाळून चालवायची "ती'अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाउल...

सुपारी, तंबाखूचे दर गगनाला भिडले, साठवणूक वाढली
राज्यात सुगंधित तंबाखूवर बंदी घातली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. साठेबाजारांनी तंबाखूची चढ्या भावात विक्री केली. त्याबरोबरच सुपारीचेदेखील भाव वाढल्याचे कारण पुढे करीत चढ्या भावात विकली. यामुळे खर्ऱ्याचे भाव आकाशाला भिडले. अठराशे रुपयाला विकणारा "माजा तंबाखू 3200 रुपयाला, 580 रुपयाला विकणारे ईगल तंबाखूचे पाकीट 2200 रुपयाला आणि साधी पाच रुपयाला विकणारी ठवकर तंबाखूची पुढी वीस रुपयाला विकली जाते. 250 रुपये किलोने विकणारी सुपारी सातशे रुपयाला विकली गेली. त्यामुळे नाइलाजास्तव छुप्या पद्धतीने वीस रुपयाला विकणारा खर्रा तीसला आणि वीस रुपयाला विकणारा खर्रा पन्नास रुपयाला विकावा लागल्याचे एका पानठेला दुकानदाराने सांगितले.

हेही वाचाः बापरे !चक्‍क पित्याने केला पेट्रोल टाकून मुलाला संपविण्याचा प्रयत्न, कारण होते...

भेसळ केला जातो पालापाचोळा
शहरी भागाबरोबच ग्रामीण भागातदेखील खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. काही मजूर महिलादेखील आहारी आहेत. काहींना तर खर्रा खाल्ल्याशिवाय तरतरी येत नाही. विदर्भात सर्वाधिक विकला जाणारा खर्रा इतर राज्यात मिळणे जिकिरीचेच आहे. आता तर पालापाचोळ्यापासून तयार केलेली भेसळ तंबाखू विकला जात आहे. यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवण्याची दाट शक्‍यता आहे. बऱ्याच व्यापाऱ्यांनी सुगंधित तंबाखू आणि सुपारीचा साठा बाळगला आणि चढ्या भावात विकून चांगलीच कमाई केली. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानादेखील पुरवठा विभाग आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाने यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला नाही. आजही मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू विकला जात असून अशांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने !उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

धंदा करावा तर कसा !
बेरोजगारीवर मात करण्यासाठी बऱ्याच तरुणांनी कर्ज काढून पानठेला उभारला. दोन महिन्यांपासून पानठेले बंद असल्याने त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पानठेला व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाढलेल्या तंबाखूच्या वाढलेल्या दरामुळे धंदा करावा तर कसा, असाही प्रश्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpuri is also the height of reality