नळाला कुठेही स्पर्श न करता धुवा हात, 'कोरोना'पासून बचावासाठी तयार केली ही मशीन...

Nagpurkar can now wash his hands without touching the Tap
Nagpurkar can now wash his hands without touching the Tap

नागपूर : चिनमधून कोरोना विषाणू भारतात दाखल झाल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. सर्वांत अगोदर गर्दीत जाण्याचे टाळा, कुणाशीही हात मिळवू नका, शिंकताना तोंडाला हात लावू नका, सतत चेहऱ्यावर हात फिरवू नका, डोळ्यांना हात लावणे टाळा अश्‍या उपाययोजना सांगण्यात आल्या. तसेच हात कसे धुवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. स्वत:ला कोरोनापासून कसे दूर ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आता तर चक्‍क सार्वजनिक ठिकाणी नळाला हात न लावला हात धुण्याची मशीन तयार करण्यात आली आहे. याचा नागरिकांना नक्‍की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 

स्पर्श आणि संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. यामुळेच देशात लॅकडाऊन सुरू आहे. नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. रस्त्या रस्त्यांवर, चौका-चौकांत पोलिस कार्यरत असून, नागरिकांना घराबाहेर मज्जाव करीत आहेत. यामुळे थोडी का होईना स्थिती आटोक्‍यात आहे.

मात्र, अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात येत असून, कोरोना विषाणूचा धोका बळावला आहे. हीच बाब लक्षात घेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी नळाचा स्पर्श न करता हात धुण्याची अभिनव संकल्पना अस्तित्वात आणली आहे. केवळ पायांचा वापर करून साबणाने हात स्वच्छ धुण्याची ही व्यवस्था नागपुरातील रेल्वे रुग्णालयासह चार ठिकाणी कार्यान्वित झाली आहे. 

अशी आहे मशीन

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कशाचीही संपर्क आणि स्पर्श टाळणे तसेच वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, सार्वजनिक ठिकाणी नळाला हात लावणेही धोक्‍याचे ठरू शकते. आजाराची दाहकता लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने स्पर्श न करताच नळाला पाणी येईल, अशी कल्पकता लावून मशीन तयार केली आहे. डाव्या पायाने दाब दिल्यास लिक्वीड सोप बाहेर येते. तर उजव्या पायाने दाब दिल्यास नळाला पाणी येते. यामुळे कुणीही स्पर्श न करता हात धुवू शकतो.

या ठिकाणी आहे मशीन

कोरोनापासून बचावासाठी दोन दिवसांपूर्वी तयार केलेली मशीन रेल्वे रुग्णालय, रुग्णालयातील आपताकालीन विभाग, अजनी वर्कशॉप, कोचिंग कॉम्प्लेक्‍स आदी ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. अजनी येथील ए. डी. स्थुल यांच्या मार्गदर्शनात महेश वालदे, कैलाश कठारकर, मुजाहीद हुसेन यांनी ही मशीन तयार केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com