नाईक तलाव, टांगा स्टॅंड, मेहबूबपुरा परिसर "सील'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

या परिसरातील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. तसेच बाहेरील नागरिकांना या परिसरात जाता येणार नाही. 

नागपूर : नाईक तलाव, टांगा स्टॅंड, मेहबूबपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे आयुक्तांनी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. या परिसरातील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. तसेच बाहेरील नागरिकांना या परिसरात जाता येणार नाही. 

आशीनगर झोनमधील प्रभाग 3 मधील मेहबूबपुरा, संघर्षनगरमध्ये कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे परिसर "सील' करण्यात आला. येथील टिपू सुलतान चौक, शिवाजी चौक, अब्दुल अझीज यांचे घर, एसएनकेजी इंजिनिअरिंग, सलीम शेख यांचे घर, शाही ट्रॅव्हल्स कार्यालयपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग 20 मधील नाईक तलाव-बैरागीपुरा परिसरात आज एकूण 19 कोरोनाबाधित आढळून आलेत. त्यामुळे उत्तर पूर्वेस रमेश अहिरकर यांचे घर, पूर्वेस तायडे यांचे घर, गीरमाजी सावजी यांचे घर, दक्षिण-पूर्वेस मनपा उद्यान, दक्षिण-पश्‍चिमेस केसरवानी यांचे घर, पश्‍चिमेस विनोद माहुरे यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस गोपाल गाते यांचे घर, हा परिसर बाहेरील नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला.

येथील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नाही. गांधीबाग-महाल झोनअंतर्गत प्रभाग 19 मधील इतवारी परिसरातील टांगा स्टॅण्ड परिसरही प्रतिबंधित घोषित करण्यात आला. सिटी पोस्ट ऑफिस, खुळे निवास, युनिक कलेक्‍शन, गुजराती चाळ, साईबाबा बेकरीपर्यंतच्या परिसरात प्रतिबंध लावण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naik lake, tanga stand and mehbubpura area seal