सकाळ एनआयई'नाट्यस्पर्धेला प्रारंभ, रंगमंचावर बालरंगकर्मींची धूम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कार्यक्रमाला आरव ऍकेडमी ऑफ सायन्सचे डॉ. राम मासुरके, सामाजिक समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष नरवाडे, भारतीय कृषी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, सेंट एम. बी. हायस्कूलचे संचालक डॉ. धनराज भुते, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, कामगारकल्याण मंडळाचे प्रभारी सहायक कल्याण आयुक्‍त अरुण कापसे, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, जाहिरात मुख्य व्यवस्थापक सुधीर तापस, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक विजय वरफडे, परीक्षक प्रा. डॉ. संगीता टेकाडे व डॉ. माणिक वड्याळकर उपस्थित राहणार आहेत.

नागपूर : "सकाळ एनआयई'च्या वतीने आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारपासून रंगमंचावर बालरंगकर्मींची धूम अनुभवता येणार आहे. रघुजीनगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात स्पर्धा रंगणार आहे. शुक्रवारी (31 जानेवारी) सकाळी दहाला प्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. शहरातील 16 शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या असून विजेतेपद मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे.

अवश्य वाचा - युवतीने केला ‘स्पीड चेक’ अन घडले हे

कार्यक्रमाला आरव ऍकेडमी ऑफ सायन्सचे डॉ. राम मासुरके, सामाजिक समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष नरवाडे, भारतीय कृषी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, सेंट एम. बी. हायस्कूलचे संचालक डॉ. धनराज भुते, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, कामगारकल्याण मंडळाचे प्रभारी सहायक कल्याण आयुक्‍त अरुण कापसे, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, जाहिरात मुख्य व्यवस्थापक सुधीर तापस, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक विजय वरफडे, परीक्षक प्रा. डॉ. संगीता टेकाडे व डॉ. माणिक वड्याळकर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेसाठी छत्रपती चौक नागपूर येथील आरव ऍकेडमी ऑफ सायन्सचे डॉ. राम मासुरके, सामाजिक समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष नरवाडे, झिंगाबाई टाकळी नागपूर येथील गोपाल एज्युकेशन सोसायटीअंतर्गत भारतीय कृषी विद्यालय, सेंट एम. बी. हायस्कूल, राणी दुर्गावती चौक, बिनाकी मंगळवारी नागपूर, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत व कामगारकल्याण केंद्र नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. एकूण 16 शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, विजेत्यांना आकर्षक पुरस्कार तसेच वैयक्तिक पुरस्कारही प्रदान केले जाणार आहेत. एक फेब्रुवारीला सायंकाळी पाचला पुरस्कार सोहळा होईल. बालकलाकारांच्या अभिनय कलेला वाव देण्याकरिता व प्रोत्साहित करण्याकरिता नागपूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन "सकाळ एनआयई'तर्फे करण्यात आले आहे.

वेळापत्रक

31 जानेवारी, शुक्रवार

 • -सलाम नमस्ते (राही पब्लिक स्कूल, जयताळा रोड)
 • -वृध्दाश्रम (आदर्श संस्कार विद्यालय, श्रीकृष्णनगर)
 • -सेव्ह गर्ल चाइल्ड (आदर्श संस्कार विद्यालय, पिपळा हुडकेश्वर)
 • -सावित्रीबाई फुले (आर्या कॉन्व्हेंट, दिघोरी)
 • -गाव तिथे शौचालय (रिजेंट हायस्कूल, सूतगिरणीजवळ, हिंगणा)
 • -देशभक्ती (तेजस्वी विद्यामंदिर, महाजनवाडी, हिंगणा)
 • -प्लॅस्टिक बंदी काळाची गरज (महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल, वानाडोंगरी)
 • -करावे तसे भरावे (सेंट. एम. बी हायस्कूल, राणी दुर्गावती चौक)
 • -स्वच्छता में सुंदरता (विद्यासाधना हायस्कूल, जयताळा रोड)

 

1 फेब्रुवारी, शनिवार

 • -विषय गेले पळून (श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालय)
 • -गुरुदक्षिणा (सत्यसाई विद्यामंदिर व कॉन्व्हेंट, अंबिकानगर, नरसाळा)
 • -नशामुक्त राष्ट्र (भारतीय कृषी विद्यालय, झिंगाबाई टाकळी)
 • -आंतर मुख (स्कूल ऑफ स्कॉलर्स, हुडकेश्वर)
 • -मदर्स डे (यशोदा मराठी प्राथमिक शाळा, यशोदानगर)
 • -टेंभा (भवन्स. बी. पी. विद्यामंदिर, कोराडी रोड)
 • -बेंडवा (विश्वास माध्यमिक विद्यालय, श्रीकृष्णनगर)
 • -घायाळ पाखरा (बहुजन रंगभूमी नागपूरतर्फे विशेष प्रस्तुती)
 • वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6 (दोन्ही दिवस)
 • स्थळ : कामगारकल्याण भवन, राजे रघुजीनगर, नागपूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nai's dance competition begins in the morning;