जपानी गार्डनमध्ये 'निसर्ग पायवाटी'चा आनंद, नागपूर वनविभागाचा नवा उपक्रम

राजेश रामपूरकर
Wednesday, 2 December 2020

दोन तासांच्या निसर्ग पायवाटेच्या कार्यक्रमात जपानी गार्डनमधील लॅण्डस्केप आणि त्याच्या विविध वनस्पती, जैवविविधता पाहता येणार आहे. सामंजस्य कराराच्या वेळी बोलताना विकास गुप्ता म्हणाले, या उपक्रमात विभागाने विशेषत: तरुण व मुलांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

नागपूर : नागपूर वन विभागाने जपानी गार्डनमधील निसर्ग पायवाट या निसर्ग शिक्षण देणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे अजिंक्य भटकर उपस्थित होते. सेंटर फॉर निमल रिसर्च अ‌ॅण्ड स्टडीज (सीएआरएस) सोबत वनविभागाने सामंजस्य करार केला आहे. 

हेही वाचा - मेहा गावात तरुणांनी साकारली अभ्यासिका, स्पर्धा...

दोन तासांच्या निसर्ग पायवाटेच्या कार्यक्रमात जपानी गार्डनमधील लॅण्डस्केप आणि त्याच्या विविध वनस्पती, जैवविविधता पाहता येणार आहे. सामंजस्य कराराच्या वेळी बोलताना विकास गुप्ता म्हणाले, या उपक्रमात विभागाने विशेषत: तरुण व मुलांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे संसाधन खूप महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांची नियमितता असल्यास त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. दर रविवारी सकाळी सात वाजतापासून बालोद्यानापासून याची सुरुवात होणार आहे. २५ रुपये शुल्क सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना आकारण्यात येणार आहे, तर इतरांसाठी ५० रुपये शुल्क आकारणार आहे. गटानुसारही हा उपक्रम राबविण्यात येणार असून एका गटात १५, असे एकूण ३० जणांना यात सहभागी होता येणार आहे. दहा पायवाट कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

हेही वाचा - कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १',...

निसर्ग पायवाटमध्ये निसर्गाबाबतचे मजेदार तथ्य आणि माती, झाडे, कीटक, पक्षी, प्राणी यासारख्या वेगवेगळ्या घटकांची माहिती दिली जाणार आहे. तसेच नागरिकांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय येथील शुभम धनराज छापेकर, ममता प्रमोद भदाडे, हिस्लॉप महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच प्रा. कुमुद पायदेलेवार, अमन देवगडे हे सहभागींना मार्गदर्शन करणार आहे. या गार्डनमध्ये १०० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजाती, पक्ष्यांच्या प्रजातींसह सुमारे १०० प्रजातींच्या फुलपाखरे आहेत. ३३ प्रकारच्या वृक्षाचा समावेश आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: natural education program in japani garden nagpur