नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा झाला कमी; आढळले १५० रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू 

केवल जीवनतारे 
Monday, 18 January 2021

त्यातच आज दिवसभरात जिल्ह्यातून तपासलेल्या २ हजार ५७८ चाचण्यांमध्ये १५० जण कोरोनाबाधित आढळले. विशेष असे की, शहरात अवघे १३० बाधित आढळले. तर ग्रामीण भागात केवळ १७ रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ९ जण दगावले आहेत.

नागपूर ः शहर आणि जिल्ह्यात करोना विषाणू प्रादुर्भावाचा उच्चांकी आकडा दोन हजारावर पोहचला होता. मात्र दहा महिन्यानंतर आता विषाणू संक्रमणाला उतरती कळा लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी आढळून येत असल्याने दिलासा मिळत आहे. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

त्यातच आज दिवसभरात जिल्ह्यातून तपासलेल्या २ हजार ५७८ चाचण्यांमध्ये १५० जण कोरोनाबाधित आढळले. विशेष असे की, शहरात अवघे १३० बाधित आढळले. तर ग्रामीण भागात केवळ १७ रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ९ जण दगावले आहेत.

जिल्ह्यात १५० बाधित आढळले आहेत. तर ३९४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांचा टक्केवारी ९३. ८० वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३० हजार ६१९ झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख २२ हजार ५७८ झाली आहे. यामुळे आता कोरोनाबाधित संक्रमणाचा वेग बऱ्यापैकी खाली आला असल्याचे नोंदीवतून दिसून येते. 

अधिक वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला करणाऱ्या मुलाची घेतली बाजू

आज दिवसभरात विषाणूच्या संक्रमणानंतर उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्याने प्रकृती ढासळल्यानंतर ९ जणांनी अखेरचा श्वास घेतला. त्यातील ४ जण शहरातील तर २ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर ३ जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर आतापर्यंत दगावणाऱ्यांची संख्या आता ४ हजार ८१ वर पोचली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 150 corona patients today in Nagpur