esakal | नागपुरात कोरोनाचा हाहाकार! मृत्यूंची संख्या वाढतीच.. आज तब्बल इतक्या नवीन रुग्णांची नोंद.. वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

new 235 corona patients in nagpur district today read full story

जुलैत तर प्रादुर्भावासह मृत्यूची साखळी वेगाने विस्तारली असून दर दिवसाला मृत्यूची संख्या वाढत आहे. एकीकडे जिल्ह्यात नव्याने संचारबंदीची जोरदार चर्चा सुरू असून, दुसरीकडे कोरोनाच्या मृत्यूचा ब्लास्ट होत आहे. 

नागपुरात कोरोनाचा हाहाकार! मृत्यूंची संख्या वाढतीच.. आज तब्बल इतक्या नवीन रुग्णांची नोंद.. वाचा सविस्तर 

sakal_logo
By
केवलजीवनतारे

नागपूर: पाच महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोनाचा शिरकाव झाला. तब्बल तीन महिने आटोक्यात असलेल्या कोरोनाचा उद्रेक जूनपासून सुरू झाला. जुलैत तर प्रादुर्भावासह मृत्यूची साखळी वेगाने विस्तारली असून दर दिवसाला मृत्यूची संख्या वाढत आहे. एकीकडे जिल्ह्यात नव्याने संचारबंदीची जोरदार चर्चा सुरू असून, दुसरीकडे कोरोनाच्या मृत्यूचा ब्लास्ट होत आहे. 

आजची आकडेवारी 

उपराजधानीतील मेडिकल, मेयोसह इतर रुग्णालयांमध्ये २४ तासांमध्ये आणखी १४ बाधितांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा १६७ वर पोहोचला तर २३५ बाधितांची संख्या आहे. मेयो आणि मेडिकलमध्ये रविवारी कोरोनाच्या बाधेने १४ जण दगावले आहेत. यातील ९ जण मेयोत तर पाच जण मेडिकलमध्ये मृत्यू पावले. 

हेही वाचा - शादी डॉट कॉमवर दोघांचे प्रोफाईल मॅच झाले. मने जुळली, लग्नही झाले. मग उघड झाले हे सत्य...

आजचे मृत्यू

झिंगाबाई टाकळीतील जुनी वस्ती येथील ७० वर्षीय महिलेला २८ जुलै रोजी मेयोत दाखल केले. लगेच कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसात ही महिला दगावली. मानकापूर येथील ५९ वर्षीय व्यक्तीलादेखील २७ जुलै रोजी मेयोत दाखल केले. त्यांचा तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला. मोमिनपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष रविवारी सकाळी सात वाजता दगावला. 

रक्तदाब आणि मधुमेहामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. तर जुनी मंगळवारी येथील ३९ वर्षीय पुरुष मध्यरात्री दगावला. अतिमद्य सेवनामुळे त्यांना फुप्फुसाची गंभीर समस्या होती. त्यातच त्यांना कावीळ झाला होता. श्वसनयंत्रणा कोलमडली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला. कामठीतील ६० वर्षीय पुरुष, जाफर नगर येथील ६० वर्षीय पुरुष तसेच कामठीतील विणकर कॉलनीतील ५४ वर्षीय महिला दगावली. काटोल येथील २५ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. दही बाजार (इतवारी) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. मेयोत दगावलेल्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाबसह इतर काही आजारांचा इतिहास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही रुग्णांना इतर गंभीर आजार नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

मेडिकलमध्येही रविवारी ५ जण दगावले. हिंगणघाटच्या एका ७४ वर्षीय महिलेसह नागपुरातील विश्वकर्मानगर येथील ७१ वर्षीय महिला दगावली. हुडकेश्वर येथील ७१ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील ६३ वर्षीय महिला कोरोनाच्या बाधेने दगावल्याची नोंद झाली. मेडिकलमध्ये २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सारी आजारामुळे दगावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. मात्र त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या १६७ वर पोहोचली आहे. तर येथील शहर व ग्रामीण भागात दिवसभरात नवीन २३५ नवीन बाधितांची भर पडली आहे. त्यात शहरातील १५० तर ग्रामीणच्या १५० बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या येथील बाधितांची संख्या ५,९०० च्या जवळपास पोहोचली आहे.

हेही वाचा - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

इतर जिल्ह्यातून रेफर रुग्‍णांची संख्या १०९

मेयो व मेडिकल येथे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले. विदर्भात सर्वच ठिकाणी कोविड रुग्णालय तयार करण्यात आले. मात्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून मेयो आणि मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना रेफर करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विदर्भासहित मध्य प्रदेशातून सुमारे १०९ जणांना आतापर्यत रेफर करण्यात आले. यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. रेफर रुग्णांमुळे नागपूर जिल्ह्यातील मृत्यूचा तसेच बाधितांचा टक्का वाढला आहे.

- आठवडाभरात नागपुरात ६२ मृत्यू
- रविवारी मेयो-मेडिकलमध्ये ७ पुरुष, ७ महिलांचा मृत्यू
- पाच महिन्यांत बाधितांची संख्या ५ हजार ८९७
- मागील ३३ दिवसांत वाढले ४ हजार ३९२ रुग्ण
- मेयो, मेडिकल, एम्समध्ये १९६७ बाधित घेत आहेत उपचार

संपादन - अथर्व महांकाळ