Corona Update: नागपुरात आज नवे ४५२ पॉझिटिव्ह तर ८ जणांचा मृत्यू 

केवल जीवनतारे
Thursday, 26 November 2020

नागपुरात मागील १० महिन्यांत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजारावर असला तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ हजार १ हजार ८८९ वर पोहोचली आहे.

नागपूर ः वाढत्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दर दिवसाला अधिक संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी (ता.२६) नव्याने ४५२ बाधितांची भर पडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार ३३२ वर पोहोचली आहे. तर २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८ मृत्यू नोंदवण्यात आले असून मृतांचा आकडा ३ हजार ६२८ वर पोहोचला आहे.

नागपुरात मागील १० महिन्यांत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १० हजारावर असला तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ हजार १ हजार ८८९ वर पोहोचली आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत सर्वाधिक सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील ८० हजार ३९५ तर ग्रामीण भागातील २१ हजार ४९४ जणांचा समावेश आहे. 

मागील महिनाभर बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त होती. परंतु, आता पुन्हा चित्र पालटल्याचे दिसून येते. गुरुवारी जिल्ह्यात ४५२ नवे बाधित आढळले तर १५० जणांनी कोरोनावर मात केली. नागपुरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्‍णांची संख्या आता १ हजार ५५३ वर पोहचली आहे.

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

बाधितांच्या एकूण ३ हजार ६२८ मृत्यूंपैकी शहरातील २ हजार ५१५ तर ग्रामीणमधील ६२१ मृत्यू आहेत. जिल्ह्याबाहेरील मृतांचा आकडा ४९२ झाला आहे. मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण नागपुरात सुरू झाल्यानंतर सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात नोंदवले गेले. मागील १० महिन्यात जिल्ह्यात ७ लाख ६२ हजार ३९५ कोरोनाच्या चाचण्या झाल्या. यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ४ लाख ३२ हजार २२६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या ३ लाख ३० हजार १६९ एवढी आहे.

मेडिकलमध्ये दुप्पट रुग्ण

मेडिकलमध्ये गुरुवारी २०५ कोरोनाबाधित उपचार घेत होते. तर मेयोत अवघे ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. एम्सममध्ये ३३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये १ हजार ४२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मेयोत १ हजार २६४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एम्समध्ये २० जण दगावले आहेत. ९११ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New 452 corona positive today in Nagpur