देहव्यापाराचा नवीन फंडा : ‘अश्लील व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटिंग’ करायची तर मोजा तब्बल इतके रुपये

अनिल कांबळे
Saturday, 26 December 2020

अनेक तरुणी थेट फेसबुकवर खुलेआम सेक्स चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आमंत्रण देतात. चक्क फेसबुकमधील स्टोरीमध्ये अर्धनग्न व्हिडिओ आणि मादक, कमी कपड्यात फोटो टाकतात. त्यावर व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकावर चॅटिंग केल्यानंतर गुगल पे किंवा फोन पे क्रमांक दिला जातो.

नागपूर : सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणींनी देहव्यापाराचा नवीन फंडा आखला आहे. आंबटशौकीनांना हेरून व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवरून ‘लाईव्ह न्यूड व्हिडिओ कॉलिंग आणि सेक्स चॅटिंग’ करून पैसे कमावत आहेत. तरुणींच्या या आमिषाला अनेक जण बळी पडत आहे. या व्यवसायात शेकडो तरुणी गुंतल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक आंबटशौकीनांना देहव्यापारातील तरुणी हेरतात. त्यांच्याशी मैत्री करून फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करतात. पैसा कमविण्यासाठी नवनवीन शक्कल शोधून काढतात. त्यासाठी न्यूड व्हिडिओ कॉलिंगचा फंडा सध्या चालत आहे.

क्लिक करा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक

अनेक तरुणी थेट फेसबुकवर खुलेआम सेक्स चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आमंत्रण देतात. चक्क फेसबुकमधील स्टोरीमध्ये अर्धनग्न व्हिडिओ आणि मादक, कमी कपड्यात फोटो टाकतात. त्यावर व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकावर चॅटिंग केल्यानंतर गुगल पे किंवा फोन पे क्रमांक दिला जातो.

१० मिनिट लाईव्ह व्हीडिओ चॅटिंगचे ३०० रुपये आकारण्यात येते. पैसे जमा केल्याचा स्क्रीन शॉट पाठविल्यानंतर तरुणी लाईव्ह व्हिडिओ कॉल करते. त्यामध्ये अश्‍लील संभाषण आणि मनमर्जी व्हिडिओ कॉलिंग करण्यात येते. दहा मिनिटांचा वेळ संपताच ‘बाय... पुन्हा भेटूया...’ असे बोलून कॉलगर्ल फोन कट करते. सध्या अशाप्रकारे देहव्यापारातून वारांगणा पैसे कमवित असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अधिक वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे; आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

वारंवार कॉल आणि मॅसेज

स्मार्टफोनधारकाने एकदा ३०० रुपये भरून न्यूड व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्याला तरुणी वारंवार मॅसेज करते. तसेच स्वतःचे अर्धनग्न आणि अश्‍लील फोटो पाठवून आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. तसेच त्या व्यक्तीला वारंवार फोन करून ‘ऑनलाईन कब आ सकते हो’ अशी विचारणा करीत असल्याची माहिती एका युजरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

ब्लॅकमेलिंगपासून सावधान

अश्‍लील चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर ती तरुणी स्वतःचा स्मार्टफोन स्क्रीन रेकॉर्डर मोडवर ठेवू शकते. तसेच आपण अश्‍लील चॅटिंग केल्याचे स्क्रिन शॉटही सेव्ह करू ठेवू शकते. तिला पैसे न दिल्यास ते सर्व व्हिडिओ आणि स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ शकते. त्यामुळे अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणींपासून सावधान राहण्याची गरज आहे.

हेही वाचा - Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा उद्योजकांची गगनभरारी

सायबर क्राईमकडे लेखी तक्रार करा
स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक तरुणांना आकर्षित करण्यासाठी तरुणी वेगवेगळे फंडे वापरू शकते. त्यामुळे कुणीही सोशल मीडियावर अश्‍लील चॅटिंग किंवा कृत्य करू करू नये. हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. कुणाची फसवणूक झाली असल्यास किंवा कुणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी सायबर क्राईमकडे लेखी तक्रार करावी. नाव गुपित ठेवून तक्रारींवर कारवाई केली जाईल.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम, नागपूर पोलिस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New online prostitution fund growing in Nagpur prostitution news