ड्रायव्हर पती सतत राहायचा बाहेर... नवविवाहितेने केले असे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

रात्री दोन वाजताच्या सुमारास रोशन लघुशंकेसाठी झोपेतून उठला असता त्याला स्वाती घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याला एकदम धक्‍का बसला. त्याने लगेच आईवडीलांना माहिती दिली. रोशनच्या वडिलांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती होताच गिट्टीखदान पोलिस सकाळी 4 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले.

नागपूर : वैवाहिक जीवनाची सुरुवात झाल्यावर एकमेकांचा साथ हवाहवासा वाटतो. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने संबंध अधिक घट्ट होतात. मात्र बहुतांश नवविवाहित महिलांच्या नशिबी त्यांच्या जीवनसख्याची सोबत फार कमी असते. यातूनच गृहकलह जन्म घेतात. अशीच एक घटना नागपुरात पुढे आली आहे.

रोशन गायकवाड हा मालवाहू वाहनचालक आहे. तो मध्यप्रदेशात भाजीपाला नेण्याचे काम करतो. त्याचे गेल्या मे महिन्यात जळगावमधील स्वाती हिच्याशी लग्न झाले होते. दोघांचाही सुखी संसार अकरा महिन्यांपर्यंत सुरू होता. रोशन हा घरात मोठा असल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने नेहमी कामात व्यस्त राहत होता. बुधवारी जेवण झाल्यानंतर स्वाती आणि रोशन यांनी बॅडमिंटन खेळले. तर रोशनचे आई-वडील आणि भाऊ हे हॉलमध्ये झोपले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास स्वाती आणि रोशनही झोपी गेले.

रात्री दोन वाजताच्या सुमारास रोशन लघुशंकेसाठी झोपेतून उठला असता त्याला स्वाती घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्याला एकदम धक्‍का बसला. त्याने लगेच आईवडीलांना माहिती दिली. रोशनच्या वडिलांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती होताच गिट्टीखदान पोलिस सकाळी 4 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. स्वातीच्या लग्नाला 11 महिने झाले होते. दोघात काहीच वाद नव्हता. त्यामुळे स्वातीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

स्वातीच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली. स्वातीचे वडील जळगाव येथे असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये येण्याची परवानगी घ्यावी लागली. स्वातीच्या वडिलांनी पीएम करण्यासाठी थांबविण्याची विनंती केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून केवळ 11 महिन्यातच संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 

अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...

पती वेळ देत नसल्याची कुणकुण 
रोशन हा वाहनचालक असून तो मध्यप्रदेशात मालाची ने-आण करायचा. त्यामुळे त्याला घरातून तीन-चार दिवस बाहेर राहावे लागत होते. मात्र, ही बाब स्वाती समजून घेत नव्हती. पती आपल्याला वेळ देत नसल्याची तिची कुणकुण सासू-सासऱ्यांपर्यंत पोहचली होती. तसेच स्वाती काही दिवसांपासून माहेरी जाण्यासाठी रोशनकडे हट्ट करीत होती. परंतु, रोशन वेळ नसल्यामुळे तिच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होता, अशी परिसरात चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly married women tragedy