मेडिकलमधील आकस्मिक भेट हरवले, कॅज्युअल्टीसह वॉर्डातील रात्रकालीन रुग्णसेवा मोबाईलवरूनच

night doctor service to patients is on call in causality ward in gmc nagpur
night doctor service to patients is on call in causality ward in gmc nagpur

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल)च्या आपत्कालीन विभाग, सर्जरी कॅज्युअल्टीत रात्रकालीन रुग्णसेवेत वरिष्ठ डॉक्‍टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होते. यावर उपाय म्हणून मेडिकल प्रशासनाने आकस्मिक भेट पथक तयार केले आले होते. परंतु, पुढे ही अभिनव योजना पार बारगळली. आकस्मिक भेट पथक हरवले. पुन्हा कॅज्युल्टीसह वॉर्डातील रात्रकालीन रुग्णसेवा मोबाईलवरून ऑनकॉल असते, अशी माहिती पुढे आली आहे. 

मेडिकलमध्ये रात्रकालीन रुग्णसेवा देताना अनेक डॉक्‍टरांचे मोबाईल क्रमांक वॉर्डाच्या भिंतीवर लिहिले असतात. वरिष्ठ डॉक्‍टर तर रात्रकालीन सेवेत दिसत नाहीत. परंतु, ज्या डॉक्टरांवर वॉर्डाची जबाबदारी आहे, ते देखील गायब असतात. अचानक रुग्ण आल्यास परिचारिका मोबाईल क्रमांकावरून डॉक्‍टरला कॉल करतात. गरज असल्यास डॉक्‍टर वॉर्डात हजेरी लावतात अन्यथा मोबाईलवरूनच उपचार सांगून त्यावर तोडगा काढतात. असे एक नव्हे तर अनेक प्रकार पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये डॉक्‍टर उपस्थित राहत नाहीत, योग्य उपचार होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात येत होत्या. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये आकस्मिक भेट पथक तयार करण्याची योजना आखली. या आकस्मिक पथकाने एक दोन वेळा बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभागास भेट दिली होती. यानंतर मात्र हे पथक हरवले, आता आठ वर्षे झाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे असताना त्यांनी मध्यरात्री भेट देत होते. यामुळे काही प्रमाणात डॉक्‍टर वॉर्डात दिसू लागले होते. अलिकडे सारे डॉक्टर ऑन कॉल असतात. 

सर्जरी कॅज्युल्टीत प्लॅस्टिक विभाग नेहमीच ऑन कॉल - 
मेडिकलमध्ये तातडीच्या रुग्णसेवेचा कणा कॅज्युअल्टी आहे. अपघातामध्ये जखमी रुग्णांवर जनरल सर्जरीचे डॉक्टर नेहमीच दिसतात. मात्र, प्लॅस्टिक सर्जरीचे डॉक्टर ऑन कॉल असतात. नुकतेच एका प्रकरणात प्लॅस्टिक सर्जरीच्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर तास दोन तास निघून गेल्यानंतरही डॉक्टर पोहचले नाही. कनिष्ठ निवासी डॉक्‍टर येथे तैनात होते. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कॉल केला. मात्र, ते आले नाही. यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोरोनाचा काळ असल्याने रुग्णांना संक्रमणाची जोखीम संभवते. हा धोका टाळण्यासाठी येथे पूर्णवेळ प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांची नियुक्ती कॅज्युल्टीत असावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे, असे त्रिशरण सहारे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com