जिल्ह्यात आशादायक चित्र; नव्वद टक्क्यांवर बाधित कोरोनामुक्त

Ninety percent coronavirus patients now all right
Ninety percent coronavirus patients now all right

नागपूर : बाधितांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. नव्वद टक्के बाधित कोरोनामुक्त झाले आहे. आता केवळ पावणे सहा हजार रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात सात बळींची नोंद करण्यात आली असून, नवे ४६५ रुग्ण आढळले.

शहरतून कोरोना विषाणू हद्दपार झाला नसला तरी त्याकडे वाटचार सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्‍ह्यात आज आढळून आलेल्या नव्या ४६५ रुग्णांसह एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ५५ पर्यंत पोहोचली. यातील ८४ हजार ३१६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी ९०.६१ अशी आहे. आता जिल्ह्यात ५ हजार ७१२ बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात ३ हजार ९४६ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयेही आता रिती आहेत.

आज विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ बाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील चौघे तर ग्रामीण भागातील तिघे तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. या मृत्यूच्या संख्येसह बळींची संख्या ३ हजार २७ पर्यंत पोहोचली. शहरातील २ हजार १०२ तर ग्रामीण भागातील ५४३ जण कोरोनाबळी ठरले. जिल्ह्याबाहेरील ३८२ जणांनी शहरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

शहरातील विविध लॅबमधून आलेल्या तपासणी अहवालातून आज ४६५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात ३६२ शहरातील असून, ९७ ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्याबाहेरील सहा जण बाधित आढळले.

जिल्ह्यात शुक्रवारी ६८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील ४८२ तर ग्रामीण भागातील २०१ बाधितांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला. सध्या शहरातील ३ हजार ६१९ तर ग्रामीणमधील २०९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

सात टक्के बाधित

आज विविध लॅबमध्ये ६ हजार ५३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ४६५ जण बाधित आढळले. तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांतून आढळून आलेल्या बाधितांची टक्केवारी केवळ सात टक्के आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com