Video : खवय्यांसाठी 'खाऊ गल्ली' सादर, वाचा काय आहे विशेष...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

महापालिका आता गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण करीत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असून, नगरसेवकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. या परिसरात कचरापेटी ठेवावी, प्रत्येकाला येथे आनंदाने बसायची इच्छा होईल, अशी स्वच्छता येथे हवी.

नागपूर : खाऊ गल्लीमुळे शहराच्या इतिहासात भर पडणार आहे. इतवारी, महाल, गंजीपेठ आदी भागातील नागरिकांसाठी खाऊ गल्ली पर्यटन केंद्र ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मोठ्या हॉटेलमध्ये खाण्याची इच्छा असलेल्या गरिबांसाठी खाऊ गल्ली माफक दरात योग्य पर्याय आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

मागील अनेक वर्षांपासून नागपूरकरांना प्रतीक्षा असलेल्या गांधीसागर तलाव परिसरातील खाऊ गल्लीचे (ऑरेंज सिटी फूड प्लाझा) केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी होते. व्यासपीठावर उपमहापौर मनीषा कोठे, आमदार विकास कुंभारे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, लता काटघाये, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत आदी उपस्थित होते. 

काय झालं असावे - नऊ वर्षांचा चिमुकला कानात सोन्याची बारी घालून शाळेत गेला अन्‌...

प्रत्येक वस्तीत मैदान व्हावे, फूड प्लाझा असावा, असा प्रयत्न आहे. खाऊ गल्ली सारखे स्टॉल असावे, येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचे उपाय करावे. पार्किंगची व्यवस्था बाल भवनमध्ये केल्याबाबत कौतुक करीत गडकरी म्हणाले, या ठिकाणी 32 स्टॉल असून, त्यासाठी एकच मोठ्या गॅस सिलेंडरचा वापर कसा करता येईल? सर्वांना मोठ्या गॅस सिलेंडरमधून कनेक्‍शन देता येईल काय? याबाबत पाऊले उचलावी. या परिसरात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी खासदार निधी देण्याची घोषणाही गडकरी यांनी केली. 

महापालिका आता गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण करीत आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असून, नगरसेवकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. या परिसरात कचरापेटी ठेवावी, प्रत्येकाला येथे आनंदाने बसायची इच्छा होईल, अशी स्वच्छता येथे हवी. बंडू राऊत यांनी त्यांच्या काळात खाऊ गल्लीचा प्रस्ताव मंजूर करून निधीची तरतूद केली होती, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. संचालन बंडू राऊत यांनी तर सभापती प्रमोद चिखले यांनी आभार मानले. 

योग्य व्यक्तीच्या हस्ते लोकार्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः खवय्ये आहेत. ते विविध खाद्यपदार्थांचे शौकीन आहेत. या स्वभावाचे दर्शन यांनी आजही घडविले. "खाऊ गल्लीच्या लोकार्पणासाठी महापौर संदीप जोशी यांनी योग्य व्यक्तीची निवड केली, असे नमूद करताच हशा पिकला. लोकार्पणानंतर त्यांनी स्टॉलवर काही पदार्थांची चवही चाखली. 

Image result for sandeep joshi

अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे किऑस्क 
खाऊ गल्लीत 32 स्टॉल असून, यात आणखी आठची भर पडणार आहे. याशिवाय शहराच्या प्रमुख ठिकाणी खाद्यपदार्थांचे किऑस्क लावण्यासाठी महापालिका जागा शोधत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. खाऊ गल्लीत पुढील आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याची सुविधा करून दिली जाईल. 
- संदीप जोशी, महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari inaugurates a food galli in Nagpur