पदवीधर निवडणुकीच्या नोंदणीविषयी उदासीनता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

सप्टेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा नोंदणीचा टप्पा सुरू करण्यात आला. तोही टप्पा पार पडला. दोन्ही टप्प्यात अनुक्रमे 60 हजार आणि 66 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मतदार नोंदणी 2 लाख 88 हजारांवर होती. यावर्षी जुनी यादी रद्द करून नव्याने नोंदणी करायची आहे. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यास सुरवात झाली आहे.

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जून महिन्यात होणार आहे. त्यासाठी दोन टप्प्यांत मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्यानंतरही गेल्या निवडणुकीतील मतदार नोंदणीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी मतदारांनी नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नोंदणीचा तिसरा टप्पा सुरू असून त्यामध्येही मतदार नोंदणीबाबत पदवीधरांमध्ये उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी विविध संस्था आणि संघटना सरसावल्या आहेत. यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे ऍड. अभिजित वंजारी, भाजपशी निगडित असलेल्या विविध संघटनांचा समावेश आहे. याशिवाय बऱ्याच इच्छुक उमेदवारांनीही मतदार नोंदणीसाठी परिश्रम घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा नोंदणीचा टप्पा सुरू करण्यात आला. तोही टप्पा पार पडला. दोन्ही टप्प्यात अनुक्रमे 60 हजार आणि 66 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मतदार नोंदणी 2 लाख 88 हजारांवर होती. यावर्षी जुनी यादी रद्द करून नव्याने नोंदणी करायची आहे. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यास सुरवात झाली आहे.

सविस्तर वाचा - पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला संरक्षण
गेल्या निवडणुकीत किशोर गजभिये यांनी अपक्ष निवडणुक लढवीत बरीच मते मिळविली होती. मात्र, आता ते कॉंग्रेसमध्ये आहेत. निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस पक्षात थेट लढत असली तरी, तिसऱ्या आघाडीमध्ये वंचितने राहुल वानखेडे यांना उमेदवारी दिल्याने रंग भरला आहे. त्यात आता विद्यापीठामध्ये आपली ताकद दाखविणाऱ्या परिवर्तननेही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकाधिक नोंदणी करा
पदवीधर मतदारसंघात यावर्षी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी नोंदणी झाली आहे. ती नोंदणी वाढविण्यासाठी पदवीधरांनी अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन संघटना आणि राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No enrollment for graduate constituency