पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करताना नागपूर हे एज्यूकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. त्यासोबत औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग सुरू व्हावेत व बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऍडव्हॉटेज विदर्भ सारखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. 

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 52 हजार शेतकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी अकराशे कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबांना संरक्षण देण्याची भूमिका असल्याची ग्वाही राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी दिली. 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत याच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलिस दलाची मानवंदना स्वीकारून पथसंचलाची पहाणी केली. तसेच विविध घोषणा करीत शासकीय योजनांची महिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लीकाअर्जुन प्रसन्न, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला उपस्थित होते. 

महत्त्वाची बातमी - निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात टाकला रॉड

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. या समृद्ध लोकशाही परंपरेचे रक्षण करणे आणि तिला जोपासणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी बलीदान दिले. सामाजिक परिवर्तनासाठी ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी केलेले कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले. 

जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करताना नागपूर हे एज्यूकेशन हब म्हणून ओळखले जात आहे. त्यासोबत औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग सुरू व्हावेत व बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऍडव्हॉटेज विदर्भ सारखा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. 

सर्व शाळा डीजिटल

शासनमान्य तसेच अनुदानीत शाळेतील दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शाळा डीजिटल करण्यात येत आहेत, असेही नितीन राऊत म्हणाले. 

अवश्य वाचा - वाघ होता छाताडावर; तरीही हारली नाही हिंमत...अंगावर शहारे आणणारी ही बातमी वाचाच

नागपूरसह विभाग अग्रक्रम राहील

महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी, कामगार आणि तळागाळातील जनता यांना सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याला प्राध्यान्य दिले आहे. सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील अशी ग्वाही डॉ. नितीन राऊत यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Dr. Raut said, Will protecting every farmer's family