नाही पुस्तक नाही शाळा,बच्चा कंपनी ऑन प्लेयिंग मोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

घरातच राहत असल्याने मुलांना बराच कंटाळा येतो आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाईल याकडे त्यांचा अधिक कल दिसून येतो आहे. तेव्हा मुलांना कार्टून आणि मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांची बरीच तारांबळ उडत आहे. मुलांना घरात कंटाळा न येऊ न देता, त्यांना रमवून ठेवण्यासाठी पालकांचे कौशल्य पणाला लागत आहे.

नागपूर : कोरोनाच्या संकटाने शाळा-महाविद्यालये बंद झाली. पालकांचेही "वर्क फ्रॉम होम' सुरू झाले. केजी ते आठव्या वर्गाच्या परीक्षा जवळपास रद्द झाल्या आहेत. अशा वेळी पाल्यांना टीव्हीपासून जास्तीतजास्त वेळ दूर ठेवत त्यांना अभ्यासाकडे कसे वळवावे, याबद्दल पालकांमध्ये कमालीची चिंता दिसून येत आहे.
परीक्षा संपली रे संपली की, सुट्यांमध्ये कुठे जायचे याचे प्लॅन रंगताना दिसून यायचे. याशिवाय सुटीच्या काळात शिबिरे, हॉबी क्‍लासेस, स्पोर्ट, योग क्‍लासला पाठविले जायचे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना सुटी दिली आहे. दुसरीकडे, धास्तीने मुलांना घराबाहेर, विशेषत: समूहात खेळायला सोडायचे नाही, अशा दोन परस्परविरोधी परिस्थितीचा सामना पालकांना करावा लागतो आहे. एकीकडे घरातच राहत असल्याने मुलांना बराच कंटाळा येतो आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाईल याकडे त्यांचा अधिक कल दिसून येतो आहे. तेव्हा मुलांना कार्टून आणि मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांची बरीच तारांबळ उडत आहे. मुलांना घरात कंटाळा न येऊ न देता, त्यांना रमवून ठेवण्यासाठी पालकांचे कौशल्य पणाला लागत आहे. यासाठी अनेकदा लुडो, कॅरम, पत्ते खेळणे, पुस्तके वाचणे, चित्र रंगवणे आदी क्‍लृप्त्या पालक वापरत आहेत. याशिवाय निर्धारित वेळेत कार्टून बघू देत त्यांना रिझवून ठेवण्यात येत आहे.
माइंड गेम्सचा उपयोग
शाळा बंद असल्याने सकाळी उठल्यावर मुलांना कसे व्यस्त ठेवायचे हा रोजचा प्रश्‍न समोर असतो. त्यामुळे काही घरगुती खेळ आणि माइंड गेम्सचा उपयोग करीत आहे. शिवाय शाळेतील काही राहिलेला सिलॅबसचा सराव करण्यावरही भर आहे.
-उज्ज्वला जाधव

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात
बाहेर जाण्याचा हट्ट
खेळायला बाहेर जायचे आहे, अशी जिद्द मुलांकडून होताना दिसून येते. सतत घरी राहण्याची सवय नसल्याने सध्या त्यांना काही वेळ टीव्ही तर काही वेळ सापसिडी, लुडो, चेस, कॅरम यांसारख्या खेळात रमायला सांगतोय.
-रसिका चाफले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No exams no study due to corona