अरे व्वा! पोलिसांची तर मज्जाच मज्जा...वाचा सविस्तर

police
police

नागपूर  : कोरोनाचे संकट'आले आणि त्याचा सर्वाधिक ताण आला आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागावर. लॉकडाऊन घोषित झाले आणि समस्त जनता आपापल्या घरात बंदिस्त झाली. पोलिसांना मात्र ड्युटी बजावण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. परिणामी कोरोनाने पोलिस विभागात प्रवेश केला. एरवीही नागरिक सण उत्सव साजरे करीत असतात तेव्हा पोलिस मात्र जनतेच्या सेवेत असतात. पोळ्याचा पाडवा आणि गणेशोत्सवापासून ते हिवाळी अधिवेशनापर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त असतात. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव-मिरवणुकांवर काही प्रमाणात बंधने आल्यामुळे पोलिस बंदोबस्त शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत सार्वजनिक सण-उत्सव साजरे करण्यावर प्रशासनाने बंधने घातली आहेत. मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वात मोठा दिलासा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

प्रत्येक सण-उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात येत असतो. बंदोबस्ताचे नियोजन आठ दिवसांपासून करण्यात येते. वरिष्ठ अधिकारी बैठका घेतात. त्यानंतर जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून सण-उत्सवाच्या मिरवणुकांचा बंदोबस्त लावण्यात येतो. परंतु यावर्षी पोळ्याचा पाडवा, मारबत-बडग्या आणि गणेशोत्सवाची मिरवणूक नसल्याने पोलिस कर्मचारी बिनधास्त आहेत. हे सण संपल्यानंतर जवळपास दीड महिन्यापर्यंत कोणताही मोठा सण नाही.

थेट १७ ऑक्टोबरला नवरात्रोत्सव येत आहे. गरब्यालाही जवळपास परवानगी नसल्याने दहा दिवसांचा बंदोबस्त नसल्याने पोलिसांवरील बंदोबस्ताचा मोठा ताण नाही. दसरा आणि बौद्ध बांधवांच्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर गर्दी उसळणार नाही, त्यामुळे सर्वात मोठा बंदोबस्तसुद्धा पोलिसांना करावा लागणार नाही. आता पोलिसांनासुद्धा आपल्या कुटुंबासह साजरा करता येणार आहे.

कोरोना बंदोबस्त डोक्यावर
जरी सार्वजनिक सण-उत्सव साजरा करण्यावर बंधने असली तरी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. आजपर्यंत १५० पेक्षा जास्त पोलिसांचा कोरोना बाधित झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बंदोबस्ताची टांगती तलवार पोलिसांच्या डोक्यावर कायम आहे.

सविस्तर वाचा - सतर्क रहा! सप्टेंबर महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर.. या मंत्र्यांनी केले जनतेला आवाहन.. वाचा सविस्तर

पोलिस सज्ज
कोरोना महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव-मिरवणुकांनावर काही प्रमाणात बंधने आल्यामुळे पोलिस बंदोबस्त कमी प्रमाणात लावण्यात येणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिस सज्ज आहेत.
डॉ. नीलेश भरणे
सहपोलिस आयुक्त.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com