सदस्यांच्या आरोपावरून चौकशीची गरज नाही, सभापतींचा यू-टर्न

no need to inquiry in uniform case says nagpur zp education committee chairman bharti patil
no need to inquiry in uniform case says nagpur zp education committee chairman bharti patil
Updated on

नागपूर : विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीप्रकरणाची चौकशीची भाषा वापरणाऱ्या जि.प.च्या शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी आता यू-टर्न घेतला. सदस्‍यांनी केलेल्या आरोपावर चौकशी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. एकप्रकारे आपल्याच पक्षातील सदस्यांसह शिक्षण समितीच्या सदस्यांवर चुकीचा ठपका ठेवला. चौकशीमुळे होणारी पोलखोल लक्षात घेता त्यांनी घुमजाव केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या घुमजाववर टीका केली. 

गणवेश निकृष्टप्रकरणी सदस्यांच्या तक्रारीनंतर पाटील यांची चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. शाळांनी गणवेश खरेदी केले त्या शाळांकडून गणवेशाच्या बिलाच्या पावत्या व गणवेशाचा फोटो सादर करण्याच्या सूचना बीईओंना दिल्या. परंतु, याला शिक्षक, मुख्याध्यापकांनी विरोध दर्शविला. गणवेश विशिष्ट व्यक्तीकडून खरेदी केल्याची चर्चा आहे. चौकशी झाल्यास अनेकांची अडचण होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी चौकशी आणि बिलाच्या पावत्या मागविण्यावरून घुमजाव केल्याची चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा - संशोधनाचा निष्कर्ष! बंधनांमुळे मुलींमध्ये भावनिक...
 
निव्वळ आरोप झाले म्हणून चौकशी करण्याची गरज नाही. याप्रकरणी आतापर्यंत एकाही पालकाची तक्रार नाही. खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. खरेदी बिलाच्या पावत्याही मागविल्या नाही. फक्त लोगो व गणवेशाच्या दर्जाचा अहवाल बीईओंकडून मागविण्यात आला आहे. 
-भारती पाटील, सभापती, शिक्षण समिती. 

चौकशी झाली पाहिजे. आधी हो म्हणून आता ते नाही म्हणतात. यात नक्कीच काहीतरी काळबेरे असून पाणी कुठेतरी मुरते आहे. 
- व्यंकट कारेमोरे, उपनेते, भाजप. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com