दोन महिन्यांपासून पेन्शनच नाही; सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे बेहाल  

मंगेश गोमासे
Monday, 5 October 2020

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे गरजेचे असते. कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात ज्येष्ठ नागरिक हायरिस्क गटात मोडतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळणे आवश्यक आहे.

नागपूर ः जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षक, विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची पेन्शन अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. 

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे गरजेचे असते. कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात ज्येष्ठ नागरिक हायरिस्क गटात मोडतात. अशावेळी त्यांना पेन्शन मिळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे बऱ्याच सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची मुले विदेशात असल्याने या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पेन्शनवरच स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो. अशावेळी पेन्शन न मिळाल्यास त्यांना दैनंदिन आवश्‍यक खर्च करणे कठीण होत आहे.

"आई! सांग ना माझी काय चूक? तुझा चेहरा बघण्याआधीच माझ्या नशिबी उकिरडा का"?
 

अशावेळी अचानक प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्यांना उपचारासाठी लागणारा पैसा खिशात नसल्यास त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय उदरनिर्वाह व नियमित औषधे खरेदीसाठी अडचण निर्माण होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत जिल्हा प्रशासनाने अद्यापही सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षक, विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पेन्शन दिलेली नाही. यामुळे पेन्शनधारक कर्मचारी आणि अधिकारी चिंतेत सापडले आहेत. 

#SundaySpecial : `झणझणीत सावजी मटण` खाल्ल का... वाचा मग कसा झाला जन्म 
 

मनसे शिक्षक, शिक्षकेतर सेनेने वेधले लक्ष 

पेन्शन मिळाली नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे. दुसरीकडे या महिन्यात ४ तारखेपर्यंत सुट्या असल्याने किमान ५ तारखेला तरी पेन्शनची रक्कम जमा करून दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, देविदास काळाने, आनंद राखडे, राजू वैद्य, गजानन मेश्राम, पद्मा कहाते, अरुण चिंचाळकर यांनी करून ऑगस्ट महिन्यासह सप्टेंबर महिन्याची पेंशन सुद्धा त्वरित देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No pension for two months; Retired persons are in trouble