जनगणनेत "ओबीसी' उल्लेख नसल्यास असहकार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्त 2 ऑक्‍टोबर 2019 पासून महात्मा गांधी समाधी स्थळ, राजघाट, दिल्ली येथून निघालेली जय जगत 2020 वैश्‍विक शांतीयात्रा बुधवारी (ता. 15) नागपूर शहरात आली.
पदयात्रेचे नेतृत्व परिषदेचे संस्थापक राजगोपाल पी. व्ही. करीत आहेत. पदयात्रेत दहा देशातील पंधरा प्रतिनिधी सोबत पन्नास पदयात्री शेवटपर्यंत चालत राहणार आहेत.

नागपूर : जनगणना फॉर्ममध्ये ओबीसींचा जातनिहाय कॉलम नसल्यास असहकार करीत आंदोलन करण्याचा इशारा भारतीय पिछडा (ओबीसी) संघटन, नवी दिल्ली यांच्यातर्फे देण्यात आला.

पत्रकार परिषदेमध्ये बीपीएसएसचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर गोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात डॉ. ऍड. अंजली साळवे विटणकर यांनी पुढाकार घेत ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा रेटून धरला आहे. त्यांनी यासाठी घरोघरी पाटी लावा मोहीम राबविली. याशिवाय लोक प्रतिनिधींना निवेदन देणे, विविध आंदोलने केली. अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी विधिमंडळात सदर ठराव पास केला आहे. तसेच हा विषय संसदेत मांडून केंद्राला जातनिहाय जनगणना करण्याकरिता सुचित करावे, अशी मागणीही केली आहे. देशातील इतर राज्यातही ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

क्लिक करा - तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच
 

यासाठी 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान विदर्भातील 11 जिल्ह्यांत ओबीसी जातनिहाय जनगणना प्रबोधन दौरा व संपूर्ण भारतात खासदार निवेदन आंदोलन बीपीएसएसच्या वतीने करणार असल्याचे डॉ. गोरे यांनी यावेळी सांगीतले. पत्रकार परिषदेत पाटी लावा अभियानाच्या डॉ. ऍड. अंजली साळवे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास काळे, संयोजक रमेश पिसे, राम वाडीभस्मे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर
 

दिल्ली येथून निघालेली वैश्‍विक पदयात्रा शहरात
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्त 2 ऑक्‍टोबर 2019 पासून महात्मा गांधी समाधी स्थळ, राजघाट, दिल्ली येथून निघालेली जय जगत 2020 वैश्‍विक शांतीयात्रा बुधवारी (ता. 15) नागपूर शहरात आली.
पदयात्रेचे नेतृत्व परिषदेचे संस्थापक राजगोपाल पी. व्ही. करीत आहेत. पदयात्रेत दहा देशातील पंधरा प्रतिनिधी सोबत पन्नास पदयात्री शेवटपर्यंत चालत राहणार आहेत. यात्रा दहा देशातून, 11 हजार किलोमीटरचा मार्ग पार पाडत जिनेव्हा येथे पोहोचणार आहे. भारतात ही यात्रा दोन हजार किलोमीटरचे अंतर चालणार असून, सात राज्यांतून जाणार आहे. यात्रा 12 जानेवारीला महाराष्ट्रात प्रवेश करत असून 15 जानेवारीला शहरात येईल. यात्रेचे स्वागत महात्मा गांधी पुतळा, सदर बाजार येथे करण्यात येईल. 15 ते 19 जानेवारीदरम्यान यात्रा शहरात निवास करणार असून, यादरम्यान विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-cooperative if "OBC" not mentioned in the census