पोलिसांनो, आता ठाण्यातील ‘सेटींग’ भसकणार; तक्रारींवर गुन्हे शाखेची असणार करडी नजर 

अनिल कांबळे
Thursday, 5 November 2020

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यातील कामकाज सुलभ आणि सुटसुटीत होण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी गुन्हे शाखेला ‘अलर्ट मोड’ टाकले आहे.

नागपूर ः पोलिस ठाण्यात दाखल होणारा प्रत्येक तक्रार अर्ज किंवा दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवर गुन्हे शाखेची युनिट ‘वॉच’ ठेवणार आहेत. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी किंवा रेकॉर्डेड आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेची त्वरीत मदत मिळणार आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये रोज दाखल होणाऱ्या अर्जाचा, गुन्ह्याचा आणि तक्रारींचा आढावा घेणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यातील कामकाज सुलभ आणि सुटसुटीत होण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी गुन्हे शाखेला ‘अलर्ट मोड’ टाकले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसेच अवैध धंद्यावर अंकुश कसण्यासाठी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून गुन्हे शाखा सहकार्य करीत आहे. 

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

अनेक तक्रार अर्जांमध्ये नामांकित गुन्हेगारांची नावे असतात. मात्र पोलिस ठाण्यातील तक्रार अर्ज निकाली लागण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा तक्रार अर्जावर गुन्हे शाखेच्या युनिटमधील पोलिस कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. तक्रार अर्जाचा ताबडतोब निपटारा करण्यासाठी गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेऊन पोलिस ठाण्याच्या ताब्यात देणार आहे. गुन्हे शाखेच्या हा नवीन फंडा गुन्हेगारांसाठी घातक आहे. तक्रारदाराच्या समस्येच त्वरित निराकरण होण्यासाठी गुन्हे शाखा सकारात्मक प्रयत्न करणार आहे.

गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांचे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अवैध धंद्यांची माहिती असते. तसेच परिसरातील लहान-मोठ्या गुन्हेगारांना चेहऱ्यासह ओळखतात. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी आता पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेची जोड मिळणार आहे.

अधिक वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

‘सेटींग’ बिघडणार

अनेकदा पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रार अर्जावर उशिरा कारवाई केल्या जाते. तर ‘मलिदा’ असलेल्या तक्रार अर्जाचा ताबडतोब निपटारा केल्या जातो. गुन्हे शाखेचा आता ‘वॉच’ राहणार असल्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांची सेटींग बिघडणार असून पेंडींग अर्जाचा ढीगही पोलिस ठाण्यात राहणार नाही, अशी माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now crime department will keep watch on complaints in police station