
महावितरणकडून वीज मीटरचे नियमित रिडींग घेण्यात येते. ही प्रक्रिया सुरूच आहे. परंतु, वीज बिल अधिक अचूक असावे आणि रिडींगची पडताळणी ग्राहकांना करता यावी म्हणून ग्राहकांना स्वतःच्या वीज मीटरचे रिडींग स्वतः
वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..
नागपूर : ग्राहकांना त्यांच्याकडील वीज मिटरचे रिडींग पाठविण्यासाठी पूर्वी चार दिवसांची असलेली मुदत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार महावितरणने पाच दिवसांपर्यंत वाढविली आहे. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतून अचूक बिलासाठी स्वतः रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक (प्र.) सुहास रंगारी यांनी केले आहे.
महावितरणकडून वीज मीटरचे नियमित रिडींग घेण्यात येते. ही प्रक्रिया सुरूच आहे. परंतु, वीज बिल अधिक अचूक असावे आणि रिडींगची पडताळणी ग्राहकांना करता यावी म्हणून ग्राहकांना स्वतःच्या वीज मीटरचे रिडींग स्वतः सुलभतेने पाठविण्याची सुविधा महावितरणने कायम ठेवली आहे.
असे पाठवा रिडींग
ग्राहकांना मीटर रिडींग पाठविण्यासाठी सर्वप्रथम महावितरण मोबाईल अँप डाऊनलोड करणे तसेच ग्राहक क्रमांकासोबत हा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. महावितरण मोबाईल अँप मध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे, तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग अँप मध्ये रिडींग नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अँपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.
स्वतः रिडिंग पाठविणे लाभदायी
केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास त्यांना अनेक फायदे होणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. तसेच वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील.
संपादन - अथर्व महांकाळ
Web Title: Now Electricity Consumers Can Send Their Meter Readings Mseb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..