मतदारांनो चिंता करू नका! आता एका क्लिकवर शोधा तुमचे मतदान केंद्र; 'ही' लिंक करा गुगल

निलेश डोये 
Friday, 27 November 2020

मतदाराचे नाव व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदार यादीतील नाव तसेच मतदान केंद्राची माहिती गुगल सर्च या लिंकवर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारांनी http://103.23.150.139/GTSearch2020/ ही लिंक गुगल सर्चवर टाकल्यास मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदाराचे नाव व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

पदवीधर मतदारांना मतदार यादीतील नाव शोधणे सुलभ व्हावे, यासाठी गुगल सर्चची लिंक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे. पदवीधर मतदार संघाची मतदार यादी निवडणूक आयोगाच्या http://ceo.maharashtra.gov.in/gtserch1/ या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध आहे. मतदारांना सहज आणि सुलभपणे याद्वारे आपले नाव शोधता येईल. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक मंगळवार, १ डिसेंबरला होणार आहे.

शहरात दोन साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ

मतदारांची वाढलेली संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता दोन साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ केली आहे.
यापूर्वी भारत निवडणूक आयोगाने आपल्या २३ तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर केली होती. यामध्ये ३२० केंद्रे निश्चित केली होती. आता ३२२ ठिकाणी मतदान होणार आहे.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

१६२ केंद्रांची संख्या १६४

नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यात दोन केंद्रे वाढविण्यात आली आहेत. यामध्ये सक्करदरा मतदान केंद्र क्रमांक ८० व अयोध्या नगर मतदान केंद्र क्रमांक १०४ येथे दोन साहाय्यकारी मतदान केंद्रे राहतील. त्यामुळे जिल्ह्यातील १६२ केंद्रांची संख्या १६४ झाली आहे. इतर जिल्ह्यात कोणताही बदल नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.

 संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now you can search voting center on google