नागपूरकरांनो सावधान! पुन्हा वाढतोय कोरोना बाधितांचा आकडा; नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन 

केवल जीवनतारे 
Wednesday, 18 November 2020

तीन नोव्हेंबरला ३८५ कोरोनाबाधित बाधित आढळून आले होते. यानंतर मात्र बाधितांच्या संख्येत दर दिवसाला घट दिसत होती. मात्र अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशाच्या इतर भागातून रेल्वे किंवा विमानाने नागपुरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या स्क्रिनिंग मध्ये ढिलाई होत असल्याची चर्चा पुढे आली आहे. 

नागपूर ः कोरोना बाधितांच्या संख्येत मंगळवारी (ता.१७) अचानक वाढ झाली. २६३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. मागील २४ तासांमध्ये नागपूर जिल्ह्यात ६ जण दगावले आहेत. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ३ मृत्यू आहेत.

तीन नोव्हेंबरला ३८५ कोरोनाबाधित बाधित आढळून आले होते. यानंतर मात्र बाधितांच्या संख्येत दर दिवसाला घट दिसत होती. मात्र अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशाच्या इतर भागातून रेल्वे किंवा विमानाने नागपुरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या स्क्रिनिंग मध्ये ढिलाई होत असल्याची चर्चा पुढे आली आहे. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

ही ढिलाई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकते, अशाही चर्चेला आरोग्य विभागात उधाण आले आहे. यामुळे प्रशासनाने सावध होण्याची वेळ आहे, असाही सूर येथील वैद्यक तज्ज्ञांच्या चर्चेतून पुढे आला. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार ९२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. 

यातील २६२ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. सर्वाधिक २१५० चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या असून ७३ जण बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तर १६६२ रॅपिड ॲन्टिजेन कोरोना चाचण्यांतून १५२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एम्समध्ये ७, मेडिकलमध्ये १९ तर मेयोत ७ जण बाधित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ६१६ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. 

यातील ३ लाख ८६ हजार ५५३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर ३ लाख १२ हजार७६३ जणांच्या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र सतरा दिवसानंतर पुन्हा चित्र उलट झाले. जिल्ह्याबाहेरच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू नागपुरात झाला आहे. यामुळे बाधितांची संख्या १ लाख ६ हजार ८२४ झाली. तर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ लाख १९९ झाली आहे. तर ३ हजार ५३१ मृत्यूंची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

शहरात ८४ हजारांवर कोरोनाबाधित

११ मार्च पासून १७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शहरात ८४ हजार २५९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ७९ हजार २३८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली. नागपूर ग्रामीणसह जिल्ह्यातील १३ तालुक्यांत २१ हजार ९२९ जणांना कोरोना विषाणूने दंश केला आहे. यातील २० हजार ९६१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

हे वाचाच - सुशील-कुणालची ‘सुपारी किलींग’? नागपुरात संशयातून दुहेरी हत्याकांड; गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

रुग्णालयातील रुग्णांमध्ये वाढ

सध्या शहरात २ हजार ५४१ रुग्ण, ग्रामीणला ५५३ रुग्ण असे एकूण ३ हजार ९४ सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ हजारापेक्षा खाली आली होती. परंतु अचानक रुग्णसंख्या वाढल्याने आता १ हजार१११ वर पोहोचली आहे. गृह विलगीकरणातील संख्येत मात्र घट झाली. १ हजार ९८३ बाधित आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number pf corona patients are increasing again in nagpur