पावणे पाच रुपयांत होणार विद्यार्थ्यांचे पोषण; शासनाचा अजब तर्क

नीलेश डोये
Tuesday, 3 November 2020

धोरण तयार करणाऱ्यांची मुले याच्या पेक्षा जास्त रुपयांच्या अन्नाची नासाडी करीत असतील. केंद्र सरकारकडून मोफत तांदूळ प्राप्त होतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के निधी प्राप्त होतो.

नागपूर : शाळेतील उपस्थिती वाढविण्यासोबतच सुदृढ आरोग्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी ४.४८ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज ६.७१ रुपयांचे धान्य वाट्याला येते. एवढ्या कमी पैशात पोषण होणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सुरुवातीला या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन रुपये किलोप्रमाणे मोफत तांदूळ घरपोच दिला जात होता. २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे, असे आदेश दिले. त्यानंतर २००२ पासून या योजनेचे स्वरूप बदलून विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देणे सुरू झाले.

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

२००८ मध्ये या योजनेचा विस्तार करून इयत्ता सहावी ते आठवीचा समावेश करण्यात आला. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या व उपस्थिती वाढवून गळती थांबविण्याचा उद्देश होता. सरकारी शाळांधील संख्या पाहता यात फारसे यश आल्याचे दिसत नाही.

धोरण तयार करणाऱ्यांची मुले याच्या पेक्षा जास्त रुपयांच्या अन्नाची नासाडी करीत असतील. केंद्र सरकारकडून मोफत तांदूळ प्राप्त होतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के निधी प्राप्त होतो.

महत्त्वाची बातमी - सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

असा मिळतो आहार

  • पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आहारात उष्मांक ४५०, प्रथिने, १२ ग्रॅम, तांदूळ १०० ग्रॅम, डाळी २० ग्रॅम व पालेभाज्या ५० ग्रॅम
  • इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उष्मांक ७००, प्रथिने २० ग्रॅम, तांदूळ १५० ग्रॅम, डाळी ३० ग्रॅम, पालेभाज्या ७५ ग्रॅम

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutrition of students will be at five rupees