नायलॉन मांजा, प्लॅस्टिक पतंगावरच संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

नागपूर : नायलॉन मांजा व प्लॅस्टिकवर बंदी असूनही प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांना लक्ष्य करीत महापालिकेने गेल्या 12 दिवसांत 60 हजारांचा दंड वसूल केला. महापालिकेने या काळात 758 दुकानांवर धाड घालत सुमारे 4469 प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजाच्या 40 चक्री जप्त केल्या. यात आज जप्त केलेल्या दोन हजारांवर प्लॅस्टिक पतंगांचा समावेश आहे.

नागपूर : नायलॉन मांजा व प्लॅस्टिकवर बंदी असूनही प्लॅस्टिक पतंग विक्रेत्यांना लक्ष्य करीत महापालिकेने गेल्या 12 दिवसांत 60 हजारांचा दंड वसूल केला. महापालिकेने या काळात 758 दुकानांवर धाड घालत सुमारे 4469 प्लॅस्टिक पतंग व नायलॉन मांजाच्या 40 चक्री जप्त केल्या. यात आज जप्त केलेल्या दोन हजारांवर प्लॅस्टिक पतंगांचा समावेश आहे.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या नॉयलॉन मांजा आणि प्लॅस्टिक पतंगांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून उपद्रव शोधपथकाने एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पतंग जप्त केल्या. उपद्रव शोधपथकाने 3 जानेवारी ते 14 जानेवारी या काळात 758 दुकानांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सुमारे 4469 प्लॅस्टिक पतंग जप्त करण्यात आल्यात. 40 चक्री नायलॉन मांजा जप्त करण्यात आला तर या कारवाईतून 60 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

हेही वाचा - अहो आश्‍चर्यम्‌ नवेगावमध्ये आढळले अल्बिनो सांबर
 

मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला 77 दुकानांवर धाड घालत सुमारे दोन हजारांवर प्लॅस्टिक पतंग, 25 चक्री नायलॉन मांजा जप्त करीत 13 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनअंतर्गत नायलॉन मांजाच्या 25 चक्री जप्त करण्यात आल्या. या झोनमधील आठ दुकानदारांकडून 600 प्लॅस्टिक पतंग जप्त करण्यात आल्या. या कारवाईत तीन हजारांचा दंड करण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमधील 15 दुकानांची तपासणी करण्यात आली. यात 25 प्लॅस्टिक पतंग जप्त करीत एक हजारांचा दंड आकारण्यात आला.

क्लिक करा - तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच
 

धरमपेठ झोनमध्ये पाच दुकानांच्या तपासणीदरम्यान 500 पतंग जप्त करण्यात आल्या आणि पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. धंतोली झोनमध्ये 9 दुकानांच्या तपासणीनंतर 300 पतंग जप्त करण्यात आल्या आणि चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. नेहरूनगरमध्ये 25 पतंग, गांधीबागमध्ये 32 पतंग, लकडगंजमध्ये 646 पतंग अशा एकूण 77 दुकानांच्या तपासणीदरम्यान 2128 प्लॅस्टिक पतंग जप्त करण्यात आल्या. एकूण 13 हजारांचा दंड आकारण्यात आला.

थुंकणारे व कचरा टाकणाऱ्यांवरही दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 15 जणांवर कारवाई करीत उपद्रव शोधपथकाने आज तीन हजारांचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या 10 व्यक्तींकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपद्रव शोधपथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nylon manja and plastic kite sale banned