शहरातील पुतळ्यांना अभिवादन करून त्यांनी साजरा केला महाराष्ट्रदिन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेले शहीद, समाज सुधारकरांच्या या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये याकरिता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक हात मदतीचा मित्र परिवाराच्यावतीने शहरातील सर्व पुतळे स्वच्छ करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

नागपूर : नागपूरचे अनेक चौक या पुतळ्यांच्याच नावाने ओळखले जातात. महानगर पालिकेच्या वतीने एरवी या पुतळ्यांची देखभाल केली जाते, मात्र एखाद्या स्वयंसेवी संस्थेने या पुतळ्यांना अभिवादन करणे हे विशेष आहें असा उपक्रम महाराष्ट्र दिनी एका संस्थेने राबविला. नागपूर हे पुतळ्यांचे शहर आहे. अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील महनीय व्यक्तींचे पुतळे येथे आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेले शहीद, समाज सुधारकरांच्या या पुतळ्यांकडे दुर्लक्ष होऊ नये याकरिता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक हात मदतीचा मित्र परिवाराच्यावतीने शहरातील सर्व पुतळे स्वच्छ करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
शहरात शेकडो पुतळे आहेत. मात्र महापालिका प्रशासन कोरोना निवारणाच्या कार्यात व्यस्त आहे.  लोक घरात अडकले आहेत. त्यामुळे पुतळ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. जमावबंदीमुळे जयंती आणि पुण्यातिथीचे कार्यक्रमसुद्धा रद्द करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा - हुश्श! यंदाचा उन्हाळा गाठणार म्हणे पा-याचा   उच्चांक

त्यामुळे एक हात मदतीचा मित्र परिवारातर्फे जे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झटले, लढले त्या सर्वांचे पुतळे स्वच्छ करून त्यांना हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमातमोहित हिरडे, अमेय पांडे, बंटी आंबटकर, आशीष जोशी आदी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On occasion of Maharashtra day youth paid homage to various statues of city