नागरिकांनो सावधान! कोरोना रुग्णांच्या संख्येत होणार वाढ; धृव पॅथॉलॉजीचा जुना डाटा येणार समोर

राजेश प्रायकर 
Saturday, 17 October 2020

रामदासपेठेतील धृव पॅथॉलॉजीमधील चाचण्यांच्या नोंदीमध्ये तफावत असल्याचे मागील महिन्यात केलेल्या तपासणीत आढळून आले होते. रुग्णांची तपासणी केली, परंतु

नागपूर :  रामदासपेठेतील धृव पॅथॉलॉजीने तपासणी केलेल्या संपूर्ण रुग्णांऐवजी केवळ साडेपाचशे रुग्णांचीच माहिती महापालिकेला दिली होती. त्यामुळे महापालिकेने धृव पॅथॉलॉजीवर दंडात्मक कारवाई करीत पुढील तपासण्या थांबविण्याचे निर्देश दिले होते. आता धृव पॅथॉलॉजीतील तपासण्याचे अहवाल आयसीएमआरच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बाधितांच्या संख्येत वाढ होणार आहे.

रामदासपेठेतील धृव पॅथॉलॉजीमधील चाचण्यांच्या नोंदीमध्ये तफावत असल्याचे मागील महिन्यात केलेल्या तपासणीत आढळून आले होते. रुग्णांची तपासणी केली, परंतु पॉजिटिव्ह रुग्णांची माहिती महापालिकेला देणे टाळण्यात आले. ५, ६ आणि ७ सप्टेंबरला १४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. परंतु केवळ ५७१ रुग्णांची माहिती मनपाला देण्यात आली. 

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

आयसीएमआरला कोव्हीड पॉजिटिव्हची संख्या दररोज देणे बंधनकारक आहे. ते टाळल्याने आयुक्त राधाकृष्णन यांनी धृव पॅथॉलॉजीवर पाच लाखांचा दंड ठोठावला होता तसेच बंदीही घातली होती. त्यामुळे धृव पॅथॉलॉजीमध्ये झालेल्या एकूण चाचण्या, पॉजिटिव्हची संख्याही गुलदस्त्यात होती. 

आता तपासणी व पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या आयसीएमआरच्या पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. हे काम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बाधितांच्या संख्येत वाढ दिसून येणार आहे.

अधिक माहितीसाठी - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला 

आयुक्तांचे निर्देशानंतर धृव पॅथालॉजीकडून आईसीएमआरला कोरोना चाचणी संबंधीचा डाटा उपलब्ध करून देण्यात आला. ही माहिती आईसीएमआरकडून पुढील काही दिवसांत पोर्टलवर टाकण्यात येईल. मागील डाटा आता अपलोड करण्यात येत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल. परंतु कोरोना रुग्णांबददल आंकडयामध्ये दुरुस्तीचे हे काम असून पुढील काही दिवस चालणार आहे.
जलज शर्मा, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old data of dhruv pathology lab will be on portal