सावधान! कपड्यांची ऑनलाइन खरेदी करताय? पैशांसोबतच 'डेटा'ही पळविण्याचा प्रयत्न

राजेश प्रायकर
Saturday, 23 January 2021

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहेत. यात फसवणुकीच्या मोठ्या घटना उजेडात आल्या असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हॅकर आणि डिजिटल तज्ज्ञ एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे.

नागपूर : नुकतेच एका साड्या, सलवार सूट ऑनलाइन विक्री कंपनीने अनेक ग्राहकांचे ऑनलाइन पैसे घेऊन त्यांचे ऑर्डर रद्द केले. एवढेच नव्हे पैसे परत करण्यासाठी या कंपनीने संबंधित ग्राहकांना 'एनीडेस्क' नावाचे अ‌ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला. या अ‌ॅपमुळे एखाद्याच्या मोबाईलवरील डेटा कुणीही हाताळू शकत असल्याने ग्राहकांनी या कंपनीचा नाद आणि पैसे दोन्ही सोडले. त्यामुळे या कंपनीकडून ग्राहकांची पैशाने मोठी लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

सायबर गुन्हेगारीचे नवनवे प्रकार पुढे येत आहेत. यात फसवणुकीच्या मोठ्या घटना उजेडात आल्या असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हॅकर आणि डिजिटल तज्ज्ञ एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. अनेक घटनांची नोंद पोलिसांच्या सायबर विभागात होते. परंतु, अनेकजण याबाबत तक्रार करीत नसल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे ऑनलाइन कंपन्यांकडून फसवणूक झालेल्यांची संख्या नोंदण्यात आलेल्या संख्येच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकताच नागपुरात असाच अनुभव एका तरुणीला आला. शहरात एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने काही दिवसांपूर्वी ethnicsky.com या संकेतस्थळावर कपड्यांच्या आकर्षक सेलमुळे त्यावरून काही कपडे खरेदी केले. कपड्यांची निवड केल्यानंतर संकेतस्थळावर पैसे ट्रान्सफर करण्याचे ऑप्शन आले.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

तरुणीने १५० रुपये या संकेतस्थळावर ट्रान्सफर केले. आठ दिवसानंतरही कपडे आले नसल्याने तरुणीने दिलेल्या ट्रोल फ्री क्रमांकावर चौकशी केली. तिला कपड्यांचा ऑर्डर रद्द झाल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधिताने तिला पैसे परत मिळतील, असे आश्वस्तही केले. ९१७४५८८३६०१७ या क्रमांकावरून संबंधित व्यक्तीने पैसे परत मिळविण्यासाठी anydesk हे अ‌ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. संगणकातील तज्ज्ञ असल्याने या तरुणीच्या लक्षात आले की या अ‌ॅपवरून तिचा मोबाईल किंवा संगणक डेस्कचा डेटा दुसरा कुणीही हाताळू शकते. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीवर संताप व्यक्त केला. मोठी फसवणूक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर या कंपनीचा तसेच पैशाचाही नाद सोडल्याचे श्वेता नागपुरे या तरुणीने नमुद केले. अशाप्रकारे शहरातील अनेक तरुणींकडून या कंपनीने दीडशे ते पाचशे रुपये उकळल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा -
 
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही कपडे न आल्याने टोलफ्री क्रमांकावर चौकशी केली असता कंपनीने जेव्हा पैसे परत करण्यासाठी anydesk हे अ‌ॅप डाऊनलाऊन करण्यास सांगितले तेव्हाच मला संशय आला. पैसे गेले असते तरी पुढील संकट टळले. मोठ्या फसवणुकीची शक्यता लक्षात आल्यानंतर पैसे परत घेण्याचा नाद सोडला. 
- श्वेता नागपुरे, नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online selling company fraud with girl in nagpur