नागपुरात नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री जोरात; बंदी असूनही डिमांड 

राजेश रामपूरकर 
Tuesday, 12 January 2021

न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मनपा, पोलिस विभागाकडून कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीपोटी अनेक विक्रेत्यांनी दर्शनी भागात नायलॉन मांज्या विक्रीसाठी ठेवलेला नाही.

नागपूर ः जीवघेण्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे गेल्या आठ दिवसात दोन जणांना प्राण गमवावे लागले असून कित्येक जण जखमी झाले आहे. हजारो पक्षी या मांज्याचे संक्रांतीच्या काळात पंख व मान कापून मृत पावतात. नायलॉन मांजा विरोधात धाड सत्र राबविले जात असताना काही विक्रेते ऑनलाइन कंपन्यांकडून हा मांजा घरपोच विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

न्यायालयाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मनपा, पोलिस विभागाकडून कारवाई केली जात आहे. कारवाईच्या भीतीपोटी अनेक विक्रेत्यांनी दर्शनी भागात नायलॉन मांज्या विक्रीसाठी ठेवलेला नाही. मात्र, ग्राहकांनी नायलॉन मांजाची मागणी केल्यास त्याला ऑनलाइन नोंदणी नोंदविण्याची आणि पैसे पाठविण्यास सांगितले जाते. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

त्यानंतर काही विक्रेते नायलॉनचा मांज्या ग्राहकांनी दिलेल्या पत्त्यावर पोचवून दिला जातो. त्यासाठी भक्कम रक्कम मोजावी लागले. ८०० ग्रॅम नायलॉन मांजासाठी ४५० ते ५५० रुपये मोजावे लागत आहे. ही विक्री बेकायदेशीर असतानाही अशा वस्तू ऑनलाइन विक्री होऊच कशा शकतात असा प्रश्न उपस्थित होतो.

शहरात जे विक्रेते हा मांजा विक्री करतात त्यांच्याकडे गुजरात, सेल्वास, उत्तर प्रदेश येथून हा जीवघेणा मांजा खासगी बसेस, कुरिअर कंपन्या व ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोहचतो. यावर त्वरित कारवाई करून नायलॉन मांजा ऑनलाइन विक्रीवर बंदी करणे काळाची गरज आहे. सोशल मिडियावर ट्रेडमार्क असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे संदेश फिरू लागले असून त्यांच्याकडे मागणी केली जात आहे.

अधिक माहितीसाठी - हृदयद्रावक! उडलीच नाही त्या तरुणाच्या स्वप्नांची पतंग; दुचाकीवरून जाताना घडली मन सुन्न करणारी घटना 

पक्षी आणि व्यक्तीसाठी नायलॉन मांजा धोकादायक ठरु लागला आहे. त्यावर बंदी आणली आहे. मात्र, अजूनही काही उत्साही पतंगबाज नायलॉन मांजाने पतंग उडवीत आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करायला हवी.
विनीत अरोरा,
सचिव, सृष्टी पर्यावरण मंडळ

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online selling of Naylon manja in Nagpur