esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Only grain damage due to excess rainfall

येथील सात हजार ४१८.२८ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६ हजार ९१५ शेतकरी बाधित झाले. विशेष म्हणजे हे सर्व क्षेत्र धान पिकांचे आहेत. यात सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात दाखविण्यात आले. त्या पाठोपाठ रामटेक, पारशिवनीचा समावेश आहे.

प्रशासनाच्या अजब सर्वेक्षणाचा गजब अहवाल; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर आणि पडला नवीन प्रश्न

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. परंतु, प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आलेल्या अहवालात फक्त धान पिकांचेच नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व्हेक्षणावर प्रश्न निर्माण होत आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. परतीच्या पावसाने त्यात भर टाकली. थोडे पीक हातात येण्याची आशाही संपली. सोयाबीन, कापूस, धान, तुरीला फटका बसला. सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आले. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड आणि भिवापूर तालुक्यालाच फटका बसला.

जाणून घ्या - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

येथील सात हजार ४१८.२८ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६ हजार ९१५ शेतकरी बाधित झाले. विशेष म्हणजे हे सर्व क्षेत्र धान पिकांचे आहेत. यात सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात दाखविण्यात आले. त्या पाठोपाठ रामटेक, पारशिवनीचा समावेश आहे.

या तालुक्यात सोयाबीन, कापूससह इतर पीक ही घेतली जातात. प्रशासनाच्या सर्व्हेक्षणात या पिकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे दाखविण्यात आहे नाही. त्यामुळे या तालुक्यात फक्त धान पीकच घेतले जाते काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

अधिक माहितीसाठी - सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

नऊ कोटी बारा लाख हवे

धान पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी नऊ कोटी १२ लाख ८ हजार ७७९ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ओलीत आणि कोरडवाहू अशी वर्गावारी करून मदतीचा प्रस्ताव देण्यात आला. कोरडवाहूचे १३३४.०३ तर ओलिताचे ६०८४.२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top