
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
नागपूर : शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे दोन लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अर्जाच्या पन्नास टक्केच शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. अर्ज नाकारण्यासोबत प्रलंबित अर्जाची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघातामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास अर्थसहाय्य देण्यासाठी चार वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली.
सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येते. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो. गेल्या चार वर्षात ५१ टक्केच शेतकऱ्यांच विम्याचा लाभ देण्यात आला.
संपादन - अथर्व महांकाळ