only six classrooms for 268 students in Z.P. school
only six classrooms for 268 students in Z.P. school

268 विद्यार्थी अन्‌ सहा खोल्या, ही आहेत पटसंख्या कमी होण्याची कारणे... 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शाळांमधील वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम सोय नाही. हिंगणा तालुक्‍यातील निलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 268 विद्यार्थी असताना वर्गखोल्या केवळ सहा आहेत. यातील चार वर्गखोल्या गळक्‍या आहेत. शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही. जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा उंचावणार कसा, असा सवाल यानिमित्त उपस्थित होतो. 

निलडोह येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीत 268 विद्यार्थी मराठी व हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात. तर मुख्याध्यापकांसह शिक्षकांची 12 पदे मंजूर आहे. मात्र, त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुठे शिकवावे, हा प्रश्‍न आहे. जिल्हा परिषदेच्या इतर शाळांच्या तुलनेत येथील स्थिती भक्कम असताना प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होते. लाखो रुपये खर्चून शासनाने शाळेला विज्ञान प्रयोगशाळेकरिता उपकरणे दिली. मात्र, तेही ठेवायला जागा नसल्याचे चित्र आहे. 

त्या सहा खोल्यातच मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याचे दिव्य पार पाडले जाते. शाळेत 13 वर्गखोल्यांचे बांधकाम 1980-81 चे आहे. त्यातील सात वर्गखोल्या जीर्ण झाल्याने तोडण्याचे आदेश शाळेला प्राप्त झाले. त्यापैकी तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. ज्या तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. त्या जागेवर माध्यमिक शाळेसाठी इमारत उभारण्यात आली. कोरोनामुळे शाळा बंद आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना पाण्यात शिक्षण घ्यावे लागले असते. शिक्षण सभापती भारती पाटील यांच्यासह शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांनी शाळेला भेट दिली. परंतु, त्यानंतरही वर्गखोल्यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. 

 
दुर्घटनेस जबाबदार कोण? 


शाळेत हिंदी व मराठी माध्यम असल्याने येथे 14 खोल्यांची गरज आहे. त्यात एक विज्ञान कक्ष, संगणक कक्ष व मुख्याध्यापकांचे कार्यालय आवश्‍यक आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींच्या भेटीदरम्यान वर्गखोल्यांची मागणी केली. मात्र कार्यवाही शून्य आहे. एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण राहील, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे यांनी उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com