esakal | "कोरोना आला यात आमचा काय दोष"? आयुष्यभराची वेदना सहन करणाऱ्यांचा सवाल; वाचा सविस्तर  
sakal

बोलून बातमी शोधा

Operations of deaf children can not be done due to corona

कोरोना आला, लॉकडाउन झाले आणि कॉक्‍लिअर इम्प्लान्टही थांबले. वयाच्या पाचव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांवर ही शस्त्रक्रिया झाली नाही

"कोरोना आला यात आमचा काय दोष"? आयुष्यभराची वेदना सहन करणाऱ्यांचा सवाल; वाचा सविस्तर  

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर :  उपराजधानीत शेकडो श्रवणदोष असलेल्या मुलांवर कॉक्‍लिअर इम्प्लान्ट करण्यात आले. यामुळे या चिमुकल्यांचे बोबडे बोल यांचे आईबाबा ऐकू शकले. आईवडिलांनी दिलेल्या हाकेला या चिमुकल्यांनी "ओ' दिला. उपराजधानीत दीडशेवर चिमुकल्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला,

परंतु कोरोना आला, लॉकडाउन झाले आणि कॉक्‍लिअर इम्प्लान्टही थांबले. वयाच्या पाचव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांवर ही शस्त्रक्रिया झाली नाही, तर या मुलांच्या जगण्याला अर्थ उरणार नाही. आयुष्यभराची वेदना घेऊन ते जगणार आहेत. कोरोनाला बाजूला सारून या चिमुकल्यांवर कॉक्किलअर इम्प्लान्ट केले तरच या मुलांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल.

हेही वाचा - गुन्हेगारांनो खबरदार! लेडी सिंघमची एन्ट्री; वाहतूक विभागाच्या पहिल्या महिला अधिकारी

मध्य भारतातील श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी नागपूर हे कॉक्लिअर इम्प्लांट केंद्र आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो या दोन शासकीय रुग्णालयांसह ऑरेंज सिटी रुग्णालय, वोक्हार्ट, डॉ. कापरे रुग्णालय, असे एकूण पाच केंद्र आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट ही ५ ते १० लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया असली तरी केंद्र आणि टाटा ट्रस्टच्या वतीने आर्थिक साहाय्य करून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मदत केली जाते. शहरात आजपर्यंत दीडशेहून जास्त मुलांना या प्रत्यारोपणाचा लाभ दिला. 

विशेष असे की, कॉक्लिअर इम्प्लांटनेतर या मुलांना शासकीय योजनेतून स्पिच थेरपी दिल्याने ते बोलू लागली आहेत. मात्र कोरोनामुळे सहा महिन्यांचा कालावधी लोटला. जे पाच वर्षांचे चिमुकले कॉक्‍लीअर इम्प्लान्टच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचे सहा महिन्यांनी वय वाढले, त्यांच्या जगणे निरर्थक ठरू नये. यामुळे कॉक्‍लीअर इम्प्लान्ट करणाऱ्या केंद्रांनी ही शस्त्रक्रिया करावी आणी या मुलांचे भविष्य सुधारण्याची संधी द्यावी अशी व्यथा कोमेजलेल्या मुलांच्या पालकांनी व्यक्त केली.

मुले गरिबांची

कॉक्‍लिअर इम्प्लान्टचा खर्च गरिबांच्या आवाक्‍यात नाही. सहा महिन्यांपासून ही योजना बंद असल्याने प्रतीक्षेतील मुलांवर ही शस्त्रक्रिया झाली नाही. साऱ्या मुलांचे चेहरे कोमेजले आहेत. पद्‌मश्री डॉ. मिलिन्द कीर्तने यांच्यासह मेयोतील कान नाक घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी आणी मेडिकलमधील कान नाक घसारोग तज्ज्ञ डॉ. कांचन तडके कॉक्‍लिअर इम्प्लान्टसाठी पुढे आले तर श्रवणदोष असलेल्या कोमेजलेल्या चेहऱ्यांवर हसू फुलेल.

क्लिक करा - केळझरच्या टेकडीवरील श्री सिद्धिविनायक; वसिष्ठ ऋषींनी स्थापना केल्याची आख्यायिका

श्रवणदोषाला कारणीभूत

एक हजार बाळ जन्मदर गृहीत धरला तर त्यात ५ ते ६ बाळ जन्मत: बहिरे असतात, असा निष्कर्ष काढण्यात येतो. गर्भवती मातेच्या कुपोषणामुळे जन्मजात बहिरेपणा येतो. गर्भाची अपुरी वाढ, नात्यात विवाह होणे, आनुवंशिकता, जन्मानंतर होणारा कावीळ, डोक्यात ताप चढणे, बाळाचे जन्माच्या वेळी वजन कमी ही ज्ञात कारणे आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सर्दी, घशाचे संसर्ग यामुळे बहिरेपणा येतो तर वृद्धांमध्ये वयोमानानुसार श्रवण क्षमतेचा ऱ्हास होतो.

संपादन - अथर्व महांकाळ