esakal | तापमान जास्त आहे? चिंता नको; तुम्हालाही करता येईल पदवीधरसाठी मतदान, ही आहे पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

Opportunity to vote in the last hour for those with high temprecher

मतदानासाठी विशिष्ट रंगाचा पेन देण्यात असून, पसंती क्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. एक डिसेंबरला मतदान होणार आहे. ती तारखेला विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी १,८११ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तापमान जास्त आहे? चिंता नको; तुम्हालाही करता येईल पदवीधरसाठी मतदान, ही आहे पद्धत

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : कोरोनामुळे निवडणूक आयोगाकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मर्यादेपेक्षा जास्त तापमान असलेल्या मतदारास शेवटच्या तासात मतदानाची संधी देण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मतदानासाठी ३२० मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १५ सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदारास मास्क आवश्यक असणार आहे. प्रत्येक मतदाराचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. तापमान ३७ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास दोनदा त्याची तपासणी होईल. दोन्ही वेळेला तापमान जास्त असल्यास त्याला टोकन देऊन शेवटच्या तासात मतदानाची संधी देण्यात येईल, असे संजीवकुमार म्हणाले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

मतदानासाठी विशिष्ट रंगाचा पेन देण्यात असून, पसंती क्रमानुसार मतदान करावे लागणार आहे. एक डिसेंबरला मतदान होणार आहे. ती तारखेला विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी १,८११ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी उपायुक्त मिलिंद साळवे, आशा पठाण, निशिकांत सुके उपस्थित होते.

असे आहेत मतदार केंद्र

जिल्हा मतदान केंद्र सहाय्यक मतदान केंद्र जिल्ह्यात एकूण
नागपूर १३९ २३ १६२
वर्धा २९ ०६ ३५
भंडारा १८ ०९ २७
गोंदिया १७ ०८ २५
चंद्रपूर ३६ १४ ५०
गडचिरोली १७ ०४ २१
एकूण २५६ ६४ ३२०


अधिक वाचा - 23 नोव्हेंबरपासून शाळा सूरू, शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक!

मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • वाहन चालक परवाना
  • खासदार, आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र
  • भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले ओळखपत्र
  • विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी, पदविकेचे मूळ प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्‍वाचे मूळ प्रमाणपत्र
  • केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरित केलेले ओळखपत्र
  • संबंधित पदवीधर, शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरित केलेले सेवा ओळखपत्र

संपादन - नीलेश डाखोरे

go to top