विरोधक, आमदार व कार्यकर्त्यांनी मागितली भीख, कारण होते...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

राज्यातील महाआघाडी सरकारने लोकहिताचे निर्णय न घेता विकासकामासाठी असलेला निधी परतमागीतल्याच्या कारणावरून भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी जिल्हयात "भीख मांगो' आंदोलन केले. सरकारच्या ध्येयधोरणांवर आसूड ओढत त्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदविला आहे

नागपूर जिल्हा : भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेला स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोट्यवधींचा निधी सरकारने स्थगित केला असल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायत क्षेत्रात सोमवारी "भीख मांगो' आंदोलन करण्यात आले.
अधिक वाचा: हीच की "शिव'सेना? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद...

हिंगणा  : सोमवारी आमदार समीर मेघे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भीख मागितली. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात हिंगणा, वानाडोंगरी, वाडी नगर परिषदेचा लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी महाविकास आघाडी सरकारने स्थगित करून विकासकामाला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात वानाडोंगरी व हिंगणा परिसरात "भीख मांगो' आंदोलन केले.

अधिक वाचा : या पथकात राहिल महसूल कर्मचारी, शस्त्रधारी पोलिसांचा समावेश, वाचा कशाचे आहे "हे' पथक..

मिळाली 4090 रुपयांची भिक
मौदा : शहर भाजपतर्फे "भीख मांगो' आंदोलन करून 4090 रुपये जमा करून हे पैसे सरकारच्या तिजोरीत आपल्या माध्यमातून जमा करावे, असे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार टी. एन. नंदेश्वर यांना दिले. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेची तिजोरी रिकामी करीत आहे. त्यामुळे विकासकामावर मोठा परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा योजना, घनकचरा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नगरपंचायतची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. नगरपंचायतच्या खात्यात पडून असलेला निधी सरकार परत मागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंजूर असलेली विकासकामे रस्ते, नाली, वीजबिल, विजेचे खांब आदी विकासकामे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भीक मागून झालेली रक्कम जमा करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

अधिक वाचा: हीच की "शिव'सेना? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद...

राज्य सरकारचा ठिकठिकाणी निषेध
कुही : मंजूर योजनांचा सरसकट 67 टक्‍के निधी कपात करून विकासकामांना स्थगिती देणे, आणि भाजप शासित नगर परिषदांकडे दुर्लक्ष करणे आदी आरोप करीत भाजप जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात आज, जिल्हाभर "भीख मांगो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. कुही येथील नगर पंचायतीच्या समोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील जुवार, ईश्‍वर धनजोडे, डॉ. शिवाजी सोनसरे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition, MLAs and activists beg, the reason was