उपराजधानीत साडेतीनशेवर बेवारस वाहनं;  मनपा आणि पोलिस उगारणार कारवाईचं अस्त्र

over 350 vehicles are standing without owners in Nagpur
over 350 vehicles are standing without owners in Nagpur
Updated on

नागपूर ः शहरात विविध भागात अनेक बेवारस वाहने उभी आहेत. याच बेवारस वाहनातून अनेकदा घातपाताचे प्रकार घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुंबईत बॉम्बस्फोटानंतर याविरुद्ध मुंबईकरांनी मोहिम उघडली होती. नागपूरकरांनीही याबाबत अनेकदा महापालिका, पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे आता महापालिका व पोलिसांनी याविरुद्ध संयुक्तपणे कारवाईचे अस्त्र उगारण्याचे निर्णय घेतला. वाहनधारकांचा शोध घेऊन नोटीस दिली जाणार आहे. कुणीही पुढे न आल्यास वाहने भंगारात काढून विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी जुनी भंगार वाहने अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडून असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज महापालिकेत कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली.

या बैठकीत स्थायी समिती सभापती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग अवाड, मनपाचे वाहतूक नियोजन अधिकारी शकील नियाजी, सहायक पोलिस आयुक्त अजयकुमार मालवीय, मनपाच्या सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे आदी उपस्थित होत्या. 

यावेळी शहरातील काही बेवारस वाहनांबाबत कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी चिंता व्यक्त केली. या वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिले. बेवारस वाहने असामाजिक तत्वांसाठी अड्डा ठरत आहे. कारवाई करून असामाजिक तत्वांवरही आवर घालावा, असे यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले.

वाहनांमुळे वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळे निर्माण होत आहे. मनपाच्या मालकीच्या जागांवर या बेवारस वाहनांनी अतिक्रमण केले आहे. या वाहनांच्या विल्हेवाटीसाठी धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
- पिंटू झलके,
अध्यक्ष, स्थायी समिती.

बेवारस वाहने शोधून त्यांच्या मालकांना नोटीस देण्यात येत आहेत. ज्या वाहनांसाठी कुणीही पुढे येणार नाही. अशा वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी ‘स्क्रॅब ट्रेडिंग कॉर्पोरेशन’द्वारे कार्य केले जाणार आहे.
- सारंग आवाड,
वाहतूक पोलिस उपायुक्त.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com