नागपुरात कोरोनाबळींची संख्या साडेतीन हजारांवर; आज नवे २६१ बाधित

राजेश प्रायकर 
Friday, 13 November 2020

शहरातील विविध लॅबमध्ये करण्यात आलेल्या ५ हजार ५८८ नमुन्यांच्या तपासणीतून २६१ जण बाधित आढळून आले. यात ग्रामीण भागातील ६० तर शहरातील १९५ जणांचा समावेश आहे.

नागपूर ः शहरात दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच जिल्ह्यात आज कोरोनामुळे सहा जण दगावले. त्यामुळे या कुटुंबांवर ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला दुःखाचे संकट कोसळले. जिल्ह्याबाहेरील दोघे शहरात उपचार घेताना कोरोनाबळी ठरले. त्यामुळे बळींची संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली. दरम्यान, आज नवे २६१ बाधित आढळून आले असून, तीन हजारांवर बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील विविध लॅबमध्ये करण्यात आलेल्या ५ हजार ५८८ नमुन्यांच्या तपासणीतून २६१ जण बाधित आढळून आले. यात ग्रामीण भागातील ६० तर शहरातील १९५ जणांचा समावेश आहे. सहा जण जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ६ हजार १४५ पर्यंत पोहोचली. 

Diwali Festival 2020 : दिवाळीत फटाके फोडा अन् होईल बीजांकुर; कानठळ्याही बसणार नाही

ग्रामीण भागातील २१ हजार ७९८ तर शहरातील ८३ हजार ७१७ बाधितांचा यात समावेश आहे. शहराबाहेरील ६३० जण बाधित आढळून आले. दरम्यान, आज ३३८ बाधित कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना उद्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे. यात १५६ ग्रामीण तर १८२ जण शहरातील आहेत. शहरात आता ३ हजार १७९ बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागात ६८६ तर शहरात २ हजार ४९३ जण उपचार घेत आहेत. यातील २ हजार ६२ जण गृहविलगीकरणात आहेत.

दरम्यान, आज एकूण आठ जण कोरोनाचे बळी ठरले. एक ग्रामीण तर शहरातील पाच जण दगावले. दोघे जिल्ह्याबाहेरील बाधित शहरात दगावले. एकूण बळींची संख्या ३ हजार ५०६ पर्यंत पोहोचली. यात ग्रामीण भागातील ५९० तर शहरातील २ हजार ४६८ कोरोनाबळींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ४४८ जण दुर्दैवी ठरले.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

आज ३३८ बाधित कोरोनामुक्त झाले. यात १५६ ग्रामीण तर १८२ जण शहरातील आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या आता ९९ हजार ४६० पर्यंत पोहोचली. यात ग्रामीण भागातील २० हजार ७०४ तर शहरातील ७८ हजार ७५६ जणांचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: over 3500 people are no more due to corona in nagpur